शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जागतिक रंगभूमी दिन - राजकीय सटायरने स्टॅँडअप कॉमेडीला धूम..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 13:01 IST

' विनोद’ करणं आणि तो प्रेक्षकांपर्यंत त्याचं पद्धतीनं पोहोचविणं हे तसं कलाकारासाठी अत्यंत कठीण काम असतं आणि त्यातून तो राजकीय घडामोडींशी निगडित ' विनोद’ असेल तर मग संपलच!

ठळक मुद्देनेटिझन्सने युवा पिढीच्या  ‘स्टँड अप’ कॉमेडीला धरले उचलून

- नम्रता फडणीस- ' विनोद’ करणं आणि तो प्रेक्षकांपर्यंत त्याचं पद्धतीनं पोहोचविणं हे तसं कलाकारासाठी अत्यंत कठीण काम असतं आणि त्यातून तो राजकीय घडामोडींशी निगडित ' विनोद’ असेल तर मग संपलच! जिथं विरोधात बोललं तर अंगावर  धावून येणा-यांची संख्या अधिक आहे. त्या सध्याच्या जमान्यात एखाद्या राजकीय विषयावर किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा राहुल गांधी यांच्या एखाद्या वक्तव्यावर केलेला विनोद असो, तो कशा पद्धतीने सोशल मीडियावर घेतला जातो आणि समर्थकांकडून कशा पद्धतीनं ट्रोलिंग सुरू होतं, हे वेगळ सांगायला नको. एकीकडे ही परिस्थिती असताना युवा पिढी मात्र राजकीय विषयांवरचा स्वत:चा ’हटके’ दृष्टीकोन विकसित करीत  बिनधास्तपणे कमेंट,जोक्स द्वारे’स्टँंड अप’ कॉमेडीमधून सोशल मीडियावर अथवा प्रत्यक्ष कार्यक्रमांमधून व्यक्त होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, युवा पिढीच्या  ‘स्टँंड अप’ कॉमेडीला सोशल मीडियावर नेटिझन्सचा उदंड प्रतिसाद मिळत असून, या कार्यक्रमांवर लाईक्सचा पाऊस पडत आहे.  प्रादेशिक मराठी रंगभूमीवर  ‘स्टँंड अप’ कॉमेडीचा श्रीगणेशा कुणी केला असेल तर तो महाराष्ट्राचं लाडक व्यक्तिमत्व असलेल्या  ‘पु.लं देशपांडे यांनी. एकपात्री कार्यक्रमांद्वारे हलक्या फुलक्या विनोदाच्या माध्यमातून विषय, परिस्थिती किंवा ’व्यक्ती आणि वल्लीं’वर भाष्य करण्याचा ट्रेंड त्यांनी रंगभूमीवर रूजविला. आचार्य अत्रे यांनीही स्वत:चा श्रोतृवर्ग घडविला. त्यानंतर लक्ष्मण देशपांडे यांनी  ‘व-हाड निघालय लंडनला’ या एकपात्री प्रयोगामधून पुलंचा वारसा पुढे नेला...त्यानंतर अनेक एकपात्री कलाकारांची फळी तयार झाली .यात आता युवा पिढीही मागे राहिलेली नाही. ’कुणाल कामरा’ ने सोशल मीडियावर प्रथम स्टँड अप कॉमेडीचा प्रयोग केला आणि तो प्रचंड व्हायरल झाला. त्याच्याच पावलावर पाऊल टाकत इतर युवा कलाकार ‘लाईव्ह’ कार्यक्रमांबरोबरच सोशल मीडियाचाही  ‘स्टँड अप’ कॉमेडीसाठी पुरेपूर वापर करत आहेत.. अगदी राजकारणापासून, फुड, ट्रँव्हल, आदी विविध विषयांना त्यांनी विनोदाच्या चौकटीत गुंफले आहे. तरूणी देखील बिनधास्तपणे ब्युटी पार्लरपासून ते लग्न न जमणा-या मुलींच्या व्यथेपर्यत सामाजिक चिमटे काढताना दिसत आहेत. युवा पिढीच्या ‘स्टँंड अप’ कॉमेडी ने सोशल मीडियावर धूम केली असून,  कोणताही विरोध न करता नेटिझन्सने युवा पिढीच्या  ‘स्टँड अप’ कॉमेडीला उचलून धरले आहे. ही ‘व्हर्च्युअल’ रंगभूमीही कलाकारांसाठी वरदान ठरली आहे. ...........

’स्टँड अप’ कॉमेडीमध्ये राजकीय विषयावर भाष्य करताना कोणत्या विशिष्ट्य एका पक्षाचे आहोत वगैरे याचा कधीच विचार केला जात नाही. त्यामुळे प्रेक्षकांचा दृष्टेकोनही राजकीय नसतो. फेसबुक किंवा ट्ट्विटरवर एखाद्या नेत्याशी किंवा विशिष्ट्य विषयाशी संबंधित कमेंट, जोक्स याचा अभ्यास करून सादरीकरण काय करायचे हे मनाशी निश्चित केले जाते. त्यावर लोकांचं काय म्हणण आहे त्याचाही समावेश केला जातो. कोणत्याही पक्षाच्या विचारधारेला नाव ठेवली जात नाहीत, हे एक तत्व यात पाळले जाते. लोकांना केवळ हलक्या फुलक्या विनोदातून निखळ आनंद देणे हाच उददेश असतो- आदित्य महाजन, युवा कलाकार

...............................

बारा वर्षे नाटक करीत आहे. नाटकाची तिकिट विकण किती अवघड आहे, हे चांगलचं अवगत आहे. लोकांना सध्या  ‘विनोदा’ची खूप गरज आहे. सोशल मीडियावर सगळेच उद्रेक करीत असतात. त्यामुळे कुठतरी विनोद महत्वाचा ठरतो. त्यामुळे सोशल मीडियावर  ‘‘स्टँंड अप’ कॉमेडी करणा-या कलाकाराला आणि कार्यक्रमालाही खूप चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र हा नवीन नाही. पु.लं देशपांडे आणि आचार्य अत्रे यांनी तो रूजविला. मात्र मध्यंतरीच्या काळात तो मिमिक्रीकडे झुकला. आता पुन्हा तो राजकीय भाष्याकडे वळला आहे. आजूबाजूला काय घडत आहे त्याची निरीक्षण ठेवावी लागतात. बातम्या पाहाव्या लागतात. ही कॉमेडी क्षणिक असते. ब-याचवेळा राजकीय मतांवर टीका केली जाते. मात्र तरीही ती टीका न वाटता सटायर वाटला पाहिजे.  ‘स्टँड अप’ मध्ये थेट प्रेक्षकांशी संवाद असतो- सारंग साठे, युवा कलाकार

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटकPoliticsराजकारण