शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

झोपडपट्ट्यांमधील जगणंच धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:34 IST

लोकमत पाहणी : दाटीवाटीमुळे आगीच्या घटना

पुणे : मिळेल तेथे, वाटेल तशी बांधलेली घरे.... कच्चा बांधकामांवर चढवलेले मजलेच मजले... बेकायदेशीरपणे विजेच्या खाबांवर टाकलेले आकडे.... गॅस रीफीलिंग, बेकरीसारखे अनेक धोकादायक धंदे.... एका माणसाला पायी जाणेदेखील कठीण होईल या पद्धतीने सोडलेली दोन झोपट्यांमधील जागा.... चिंचोळे रस्ते.. ड्रेनेजलाईन, चेंबरवरच उभारलेली घरे... यामुळे अनेक ठिकाणी पुरेसा सूर्यप्रकाशदेखील येऊ शकत नाही... या परिस्थितीमुळे एखाद्या आजारी व्यक्तींला तातडीची मदत लागली तरी मिळणे कठीण... आशा ठिकाणी आग किंवा अन्य कोणत्याही प्रकारची आपत्ती आली तर अग्निशामक बंब, अ‍ॅम्ब्युलन्स पोहोचणेदेखील कठीण... अशा भयानक स्थितीत शहराच्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल ४२ टक्के म्हणजे १४ लाखांपेक्षा अधिक लोक दररोजचे आपले मरण डोळ्यांसमोर ठेवून जीवन जगत असल्याचे ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत दिसून आले.

शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीला बुधवारी आग लागली आणि तब्बल शंभराहून अधिक झोपड्या खाक झाल्या. झोपडपट्टीला आग लागल्यानंतर काही वेळातच ३० हून अधिक अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले; परंतु आग विझविण्यासाठी आत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना प्रचंड कसरत करावी लागली. या पार्श्वभूमीवर, शहरातील प्रमुख लोहियानगर वसाहत, मीनाताई ठाकरे वसाहत, रामनगर वसाहत व जनता वसाहत येथे जाऊन प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी केली. यामध्ये वरील वास्तव समोर आले.झोपडपट्टी दादांमुळे अतिक्रमण वाढतेसध्या शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेले आहे. याला सर्वांधिक जबाबदार झोपडपट्टी दादा असून, आपली लीडरशिप वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक अतिक्रमण वाढविण्यास ते प्रोत्सहान देतात. यामुळे पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येतो. झोपडपट्ट्यांकडे व्हॉट बँक म्हणून पाहण्याच्या दृष्टिकोन बदलल्यास नक्कीत बदल होईल. - डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौरलोहियानगर वसाहत : लोहियानगर वसाहतीत प्रचंड दाट लोकवस्ती असून, गल्यांमधील रस्ते एकदम चिंचोळे आहेत. लोहियानगर भागात कच्च्या बांधकामावर तीन-चार मजले उभारले आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी विजेच्या तारा धोकादायक पद्धतीने घरांच्या पत्र्याला लागल्या आहेत. त्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याचा प्रचंड धोका असल्याचे निदर्शनास आले.मीनाताई ठाकरे वसाहतया वसाहतीत एकूण १७ मुख्य गल्ल्या आहेत. या सर्व गल्ल्यांना जोडणारा एक समांतर मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर अग्निशामक दलाची गाडी येऊ शकते. परंतु, अंतर्गत रस्ते खूपच अरुंद आहेत. काही गल्ल्यांतून दुचाकीही जाऊ शकत नाही इतक्या अरुंद आहेत, तर काही वसाहतींमध्ये लघुउद्योग तसेच विविध प्रकारची दुकाने आहेत. हे लघुउद्योग अत्यंत असुरक्षितरीत्या चालवले जात असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी दुमजली, तीन मजली घरे आहेत. दुर्घटनेच्या वेळी या घरांतून ताबडतोब बाहेर पडणे अशक्य आहे. येथील लोक खूप दाटीवाटीने राहत असल्याचे दिसून आले, तसेच नागरी सुविधांचा अभाव दिसून आला.जनता वसाहत : प्रचंड दाट लोकवस्ती, गल्ल्यांमधून एकदम चिंचोळे रस्ते, डोंगराच्या पायथ्याशी असल्याने पावसाळ्यात मोठा पाऊस झाला तर खालच्या घरांमध्ये पाणी जाते, वरील सर्व कचरा पावसाने खाली येऊन मोठ्या प्रमाणात घाण साठते, वसाहतीत एकूण १०८ गल्ल्या असून, अग्निशामक दलाची गाडी ७०व्या गल्लीपर्यंतेच जाते. त्यामुळे मोठी दुर्घटना घडल्यास आपत्तकालीन यंत्रणाच पोहोचणे कठीण आहे.