शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

world doctors day : पुण्यात डॉक्टरांनी लिहिले पेशंटला पत्र  (व्हिडीओ)

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 16:59 IST

समाजासाठी अत्यंत महत्वाचा घटक असणारा हा व्यावसायिक व समाज यांच्यातील नाते पुन्हा एकदा सशक्त करण्याची गरज आहे. आणि याच कारणाकरिता बाणेर बालेवाडी असोसिएशनने एक नवा व्हिडीओ तयार केला आहे. 

ठळक मुद्देपुण्यातील बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशनचा उपक्रम पेशंटला व्हिडिओतून घातली साद 

पुणे : आज वर्ल्ड डॉक्टर डे. एकेकाळी जीवदान देणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राविषयी हल्ली प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली आहे. डॉक्टरांचा बदलता दृष्टिकोन आणि रुग्णांचा त्यावर तात्काळ येणारा नकारात्मक प्रतिसाद यामुळे या नात्यात मोठा बदल झाला आहे. पूर्वी कुटुंबातील सदस्यासारखा मिळणारा मान आता डॉक्टरला दिला जात नाही. डॉक्टरांवरचे हल्ले वाढत आहेत तसेच रुग्णाचा खर्चही अधिक होत चालला आहे. मात्र समाजासाठी अत्यंत महत्वाचा घटक असणारा हा व्यावसायिक व समाज यांच्यातील नाते पुन्हा एकदा सशक्त करण्याची गरज आहे. आणि याच कारणाकरिता बाणेर बालेवाडी असोसिएशनने एक नवा व्हिडीओ तयार केला आहे. 

या व्हिडिओत सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का'च्या धर्तीवर आधारित गाणे तयार करण्यात आले आहे. त्यात 'पेशंट तुझा डॉक्टरवर भरोसा नाय काय' असे शब्द वापरण्यात आले आहेत. या व्हिडिओच्या शेवटी पेशंटला पत्रही लिहिण्यात आले आहे. हे पत्र डॉ सुषमा प्रशांत जाधव यांनी लिहिले असून डॉ राजेश देशपांडे यांनी त्याचे वाचन केले आहे. या पत्रात डॉक्टरांवर होणाऱ्या शारीरिक हल्ल्यांवर भाष्य करण्यात आले आहे. जर डॉक्टरांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले तर त्यांना नीट सेवा करता येणार नाही असेही त्यात म्हटले आहे. ते पत्र पुढीलप्रमाणे आहे :

डियर पेशंट, 

मानवाचं शरीर म्हणजे देव या निष्णात निर्मात्याने बनवलेलं मशीन  आणि डॉक्टर म्हणजे त्याची काळजी घेणारा एक कुशल कारागीर. प्रत्येक रुग्ण आपल्या उपचाराने बरा व्हावा असंच डॉक्टरला मनापासून वाटतं. कारण यापेक्षा मोठं आत्मिक सुख त्याच्यासाठी असूच शकत नाही. मात्र कधीकधी नियती तिचा डाव टाकते. त्यावेळी तुझा आक्रोश, तुझा राग समजतो मला, पण तुझा उठणारा हात कदापिही मान्य नाही. मला काळजी वाटते ती इतकीच, की  अशा सावटाखाली सेवेचं हे झाड पुरेसं फुलणार नाही. 

टॅग्स :doctorडॉक्टरMedicalवैद्यकीय