शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा राजधानीतून जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतील - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 01:44 IST

पुणे शहर आता क्रीडा संस्कृतीचीही राजधानी झालेली आहे. बालेवाडी-म्हाळुंगे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल असल्याने, येथून भविष्यात जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.

पुणे : पुणे शहर आता क्रीडा संस्कृतीचीही राजधानी झालेली आहे. बालेवाडी-म्हाळुंगे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल असल्याने, येथून भविष्यात जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षऱ्या केलेले टेनिस बॉल रॅकेटने प्रेक्षकांच्या दिशेने टोलावले. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहूल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, संजय उर्फ बाळा भेगडे, भीमराव तापकीर, पुणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार, एसएसएलटीएचे सचिव सुंदर अय्यर, राज्याचे क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल या वेळी उपस्थित होते. मुख्य स्पर्धेपूर्वी जगातील चौथ्या मानांकीत केरोलीना मेरिन, अभिनेत्री तापसी पन्नू, टेनिसपटू लिएंडर पेस यांच्यात प्रदर्शनीय सामाना झाला.फडणवीस म्हणाले, एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेच्या निमित्ताने जगभरातील नामांकीत खेळाडू या ठिकाणी आले आहेत. त्यामुळे टेनिस प्रेमींसाठी ही मोठी पर्वणी आहे. तसेच या निमित्त जगजेत्त्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी नवोदित खेळाडूंना मिळणार आहे. त्यातून ते निश्चित प्रेरणा घेतील. अशा स्पर्धांचे वारंवार आयोजन होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र आणि पुणे निश्चितच पुढाकार घेईल. भारताचा अव्वल खेळाडू प्रजनेश गुन्नेश्वरण आणि अमेरिकेच्या मायकेल मोह यांच्यात पहिला सामना झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मैदानात थांबून सामन्याचा आनंद लुटला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस