लोणी काळभोर : ‘लोकमत’च्या बातमीची दखल घेऊन आयआरबी टोल रोड कंपनीने हवेली तालुक्यातील कवडीपाट टोलनाका ते दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील टोलनाका यादरम्यानच्या २९ किलोमीटर महामार्गावरील तुटलेले लाईट बॅरिअर्स बदलण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.१२ जानेवारी रोजी लोकमतच्या मुख्य अंकात ‘सोलापूर रस्ता ठरतोय मृत्यूचा महामार्ग’ ही बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीमध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक हद्द असलेला पुणे-सोलापूर महामार्ग चौपदरी केल्यानंतर रस्ता सरळसोट झाल्यामुळे महामार्गावरील वाहनांचा वेग वाढला. परिणामी, गेल्या वर्षभरात झालेल्या ४२५ प्राणघातक अपघातांत १६३ प्राणघातक होते. त्यांमध्ये जण १७८ मृत्युमुखी पडले असून, हे प्रमाण जिल्ह्यातून जाणाऱ्या इतर महामार्गांवरील अपघातांपेक्षा जास्त असल्याचे आकडेवारीनिशी सिद्ध झाले होते. यामुळे या टोल रोड कंपनीचा नाकर्तेपणा जनतेसमोर आला होता. या वृत्ताची दखल घेऊन टोल रोड कंपनीने हवेली तालुक्यातील कवडीपाट टोलनाका ते दौड तालुक्यातील कासुर्डी येथील टोलनाका यादरम्यानच्या २९ किलोमीटर महामार्गावरील सुमारे ८०० तुटलेले लाईट बॅरिअर्स बदलण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.
तुटलेले लाईट बॅरिअर्स बदलण्याचे काम हाती
By admin | Updated: January 23, 2017 02:28 IST