शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

घोरपडी रेल्वे उड्डाणपूलाचे काम लवकरच सुरु होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 18:17 IST

पुणे-सोलापुर आणि पुणे-मिरज रेल्वे महामार्गावर घोरपडी येथे असलेल्या रेल्वे गेटवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होते..

ठळक मुद्दे१९ कोटी ६० लाखांची तरतूद

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला घोरपडी येथील रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाची निविदा आणि निधीच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर देण्यात आली. यामुळे आता लवकरच येथील रेल्वे उड्डाणपूलाचे काम सुरु होणार आहे.     पुणे-सोलापुर आणि पुणे-मिरज रेल्वे महामार्गावर घोरपडी येथे असलेल्या रेल्वे गेटवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होते. याशिवाय घोरपडी गावातील रस्ता अरुंद असल्याने आणि रस्त्याच्या दुतर्फा दुकाने असल्याने वाहतुक कोंडीत भरच पडते. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी याठिकाणी उड्डाणपुल करण्याची मागणी नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने या ठिकाणी उड्डाणपुल उभारण्याचे नियोजन केले आहे. हा उड्डाणपुल पुणे-सोलापूर आणि पुणे-मिरज रेल्वे मार्गावर करण्यात येणार आहे. उड्डाणपुलासाठी सन २०१९ च्या अंदाजपत्रकात १९ कोटी ६० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या कामाचे पूर्वगणक पत्रक ५० कोटी रुपयांचे आहे. या उड्डाणपुलाचे काम टप्प्याटप्प्याने करावे लागणार आहे.     गेल्या अनेक वर्षांपासून या उड्डाणपुलाचे काम रखडले होते. पुणे - सोलापूर रेल्वे मार्गावर उड्डाणपुल बांधण्याचे काम मे. मनोजा स्थापत्य या ठेकेदार कंपनीकडून करून घेण्याचा आणि त्यांच्यासोबत करारनामा करण्याच्या प्रस्तावासह ३९ कोटी खर्चाचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीने सोमवारी मंजुरी दिल्याचे अध्यक्ष सुनिल कांबळे यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेTrafficवाहतूक कोंडी