शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नवी पिढी घडवण्याचे काम आंदळकरांनी केले - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 03:01 IST

सामान्य शेतकरी कुटुंबात असूनही कुस्ती क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या गणपतराव आंदळकर यांनी प्रचंड मेहनतीने देश-विदेशात यश मिळवले, तरीही त्यांचे पाय जमिनीवर होते. नव्या पिढीला प्रोत्साहन देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम सातत्याने केले.

धनकवडी - सामान्य शेतकरी कुटुंबात असूनही कुस्ती क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या गणपतराव आंदळकर यांनी प्रचंड मेहनतीने देश-विदेशात यश मिळवले, तरीही त्यांचे पाय जमिनीवर होते. नव्या पिढीला प्रोत्साहन देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम सातत्याने केले. ज्यामुळे अनेक मल्ल देशाचे नाव उज्ज्वल करीत आहेत, अशा शब्दांत आदरांजली माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी वाहिली.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलामध्ये हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष या नात्याने पवार यांनी आंदळकर यांच्या कुस्ती क्षेत्रातील भरीव कामगिरीला उजाळा दिला.पवार यांनी १९६० मध्ये दिल्लीचा खडकसिंग पंजाबी या नामवंत पैलवानाने दिलेले आव्हान आंदळकर यांनी लिलया पेलल्याची आठवण सांगितली. यावेळी आंदळकर यांचे वय होते २७ तर खडकसिंग यांचे वय होते ५४.यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनीही श्रद्धांजली वाहिली. माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, माजी खासदार अशोक मोहोळ, काका पवार, कैलास मोहोळ, बालाजी गव्हाणे, अमोल बुचडे, दत्ताजी गायकवाड, विजय गावडे, अमोल बराटे, योगेश दोडके, संयोजक मोहोळ कुस्ती संकुलाचे कार्यवाह वस्ताद माऊली मांगडे, कृष्णा फिरंगे, सयाजी जाधव आणि स्थानिक नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे, युवराज बेलदरे यांच्यासह संतोष फरांदे, सुधीर कोंढरे, कुलदीप कोंडे, रमेश कोंडे यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अ‍ॅड. दिलीप जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPuneपुणे