शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शब्द सुधीर मोघेंना शरण यायचे : डॉ. वीणा देव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 18:46 IST

सुधीर मोघे शब्दांमागचा भाव पोहचवण्यासाठी आग्रही असायचे.

ठळक मुद्दे‘आरसपानी: निवडक सुधीर मोघे’ या पुस्तकाचे प्रकाशनवयाने मोठे असले तरी मोघे हा माणूस यार

पुणे : सुधीर मोघे म्हणजे ऊर्जा देणारे व्यक्तिमत्त्व होते. कविता कशी सादर करायची, कोणत्या शब्दांवर कसा जोर द्यायचा याबाबतच्या त्यांच्या सुचना समृद्ध करणा-या असायच्या. शब्दांमागचा भाव पोहचवण्यासाठी ते आग्रही असायचे. अभिजाततेचा संस्कार त्याला घरातूनच मिळाला होता. मोघेंना शब्द शरण यायचे. त्यांनी प्रत्येक वेळी सृजनता, प्रयोगशीलता जपली, अशा शब्दांत ज्येष्ठ लेखिका डॉ.वीणा देव यांनी आठवणींना उजाळा दिला.कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे संदीप खरे यांनी संपादित केलेल्या ‘आरसपानी: निवडक सुधीर मोघे’ या पुस्तकाचे प्रकाशन वीणा देव यांच्या हस्ते झाले. यावेळी संदीप खरे, शुभदा मोघे, प्रकाशिका अमृता कुलकर्णी आणि ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम उपस्थित होते.देव म्हणाल्या, ‘मोघे यांचे निर्मितीचे उन्मेष, अनुभवसंपन्नता आणि विविध कलांमध्ये त्यांचं रमणे याचा अनुभव मी अनेकदा घेतला. कविता आणि गीतलेखन यातील सीमारेषा आणि बलस्थाने याची त्यांना जाण होती. प्रयोगशीलतेचा स्वीकार करण्याची त्यांची तयारी असायची. या शब्दवेड्या माणसाने कवितेची पालखी पुढे नेली आणि हा ध्वज नव्या पिढीमध्ये संदीप खरे नाचता ठेवत आहे.’खरे म्हणाले, ‘कवी असण्याचा कोणताही अभिनिवेश सुधीर मोघे सरांनी बाळगला नाही. त्यांचे सर्वांशी खूप छान बोलणे मनाला भिडायचे आणि त्यातून मैत्र जडले गेले. वयाने मोठे असले तरी मोघे हा माणूस यार वाटला. कलाकारापेक्षाही मोघे यांच्यातील रसिकत्व मोठे होते. त्यांच्या वागण्या-बोलण्यात नैसर्गिक सहजता होती. ते खºया अर्थाने आरसपानी होते. त्यांचं निरंकुश जगणं बेगडी वाटलं नाही. गीत सादर करताना त्यामागचा संगीतकार, कविता सादर करताना रसिकांना जिंकणारे कवी, निसगार्ची विविध रूपे कुंचल्याद्वारे रेखाटणारे चित्रकार असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे नाना रंग फुलून यायचे.’अमृता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अवधूत पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले. .....................

टॅग्स :PuneपुणेVeena Devवीणा देव