शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वेल्ह्यात महिला केसरी कुस्ती स्पर्धा, खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 02:55 IST

महाराष्ट्रात प्रथमच महिला केसरी स्पर्धा वेल्ह्यात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष राहुल काळभोर यांनी दिली. वेल्हे येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेच्या अगोदर सर्वांनी मैदानाची पाहणी केली व स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला.

मार्गासनी : महाराष्ट्रात प्रथमच महिला केसरी स्पर्धा वेल्ह्यात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष राहुल काळभोर यांनी दिली. वेल्हे येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेच्या अगोदर सर्वांनी मैदानाची पाहणी केली व स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला.महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच महिलांच्या राज्यस्तरीय कुस्तीस्पर्धा वेल्ह्यात घेणार असून, यासाठी प्रथम क्रमांकासाठी चांदीची गदा व रोख रक्कम राजमाता जिजाऊ यांच्या नावाने, तर व द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे, तर मल्लसम्राट महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील विजेत्यासाठी ८४ ते १२० वजनगटासाठी प्रथम क्रमांक जीप गाडी व गदा आणि द्वितीय क्रमांक बुलेट, तसेच ८६,७४,७०,६५, ६१,५७ या वजनगटासाठी प्रथम क्रमांकाला दुचाकी, तर द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम, अशी बक्षिसे असणार आहेत. कुमार गटासाठी होणाºया स्पर्धेतील प्रत्येक विजेत्या स्पर्धकास रोख रक्कम वेल्हे पंचायत समितीचे माजी सदस्य संतोषआप्पा दसवडकर हे देणार आहेत. वेल्हे तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव राजाराम कदम म्हणाले की, या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी १० एकरवर पार्किंग सोय करण्यात आली आहे. तसेच या स्पर्धेसाठी आंतराराष्ट्रीय व राज्यस्तरीय पंचांच्या नेमणुका केल्या आहेत. वेल्हे येथे आयोजित स्पर्धेसाठी महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष राहुल काळभोर, सचिव प्रदीप भोसले, मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाचे कोच ज्ञानेश्वर मांगडे, वेल्हे तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शंकर भुरुक, सचिव राजाराम कदम, वेल्हे पंचायत समितीचे माजी सदस्य संतोषआप्पा दसवडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य, कुलदीप कोंडे, वेल्ह्याचे माजी सरपंच संतोष मोरे, माजी उपसरपंच सुनील राजीवडे, सुनील कोळपे, विलास पांगारे, मंगेश पवार, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.स्वयंभू मेंगाईदेवी स्टेडियममहाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे सचिव प्रदीप भोसले म्हणाले की, महाराष्ट्रात कुस्ती वाढावी या उद्देशाने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित केली असून, याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात वेल्हे तालुक्यातील तोरणा किल्ला घेऊन केली होती, त्याचप्रमाणे आम्हीदेखील वेल्ह्यातून करीत आहोत.मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाचे प्रशिक्षक ज्ञानेश्वर मांगडे म्हणाले, की आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्या मॅटवर होतात, त्यासाठी गावोगावी मॅटवर मल्लांनी कुस्त्यांचा सराव करावा, या उद्देशाने ही मॅटवर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेण्यात येत आहे.वेल्हे कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शंकरनाना भुरुक म्हणाले की, राज्यस्तरीय मॅटवरील कुस्तीस्पर्धेसाठी स्टेडियम छत्रपती शिवाजी स्वयंभू मेंगाई देवी स्टेडियम हे नाव देण्यात आले आहे. या स्टेडियममध्ये विविध गॅलरी आहेत. यामध्ये स्वर्गीय मामासाहेब मोहोळ, तोरणा राजगड अशी ऐतिहासिक नावे दिली आहेत.वेल्हे (ता. वेल्हे) राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी मैदानाची तयारी सुरु असून, या मैदानाची पाहणी करताना महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष राहुल काळभोर, सचिव प्रदीप भोसले, ज्ञानेश्वर मांगडे, शंकर भुरुक, राजाराम कदम आदींसह मान्यवर.

टॅग्स :PuneपुणेSportsक्रीडा