शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
3
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
4
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
5
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
6
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
7
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
8
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
9
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
10
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
11
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
12
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
13
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
14
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
15
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
16
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
17
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
18
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
19
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना

महिलांनी केली बक्षिसांची लयलूट

By admin | Updated: December 24, 2015 00:36 IST

लोकमत सखी मंच व संस्कार आयुर्वेद आयोजित ‘उत्सव सखींचा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीही महिलांनी आनंद लुटला.

पिंपरी : लोकमत सखी मंच व संस्कार आयुर्वेद आयोजित ‘उत्सव सखींचा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीही महिलांनी आनंद लुटला. क्रांती मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम झाला. महिलांनी या खेळात सहभाग घेऊन बक्षिसांची लयलूट केली. सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर कार्यक्रम झाला.या खेळात संगीताच्या तालावर डोक्यावर एक व कंबरेवर एक हात ठेवून पळायचे व थांबल्यानंतर पंचांनी घोषित केलेल्या आकड्यानुसार संघ बनवायचे, अशा या गमतीशीर खेळात महिलांनी मनमुराद आनंद लुटला. नृत्य स्पर्धेलाही महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रत्येक खेळातून निवडलेल्या विजेत्या महिलांमध्ये अंतिम फेरीत घेण्यात आली.या फेरीत १२ महिला होत्या. अंतिम फेरीत महिलांना डोक्यावर पाण्याची भरलेली बाटली घेऊन तिचा समतोल राखत चालत ठरावीक अंतर पार करण्यास सांगण्यात आले. यातून तीन महिलांचे क्रमांक काढण्यात आले. त्या तिन्ही विजेत्या महिला पैठणीच्या मानकरी ठरल्या. यामध्ये प्रथम क्रमांक सोनम वामनकर, द्वितीय क्रमांक शोभा धुमाळ, तर तृतीय क्रमांक आशा शेंडगे यांनी पटकाविला. गायत्री सिल्क आणि पैठणीचे संचालक अमोल रोडे यांच्या हस्ते विजेत्यांना पैठणी देण्यात आली. उत्कृष्ट उखाण्यासाठी प्रिया कुलकर्णी यांना पायातील चांदीची जोडवी देण्यात आली. लकी ड्रॉमधील भाग्यवान विजेत्या श्यामल कुलकर्णी यांना सोन्याची नथ व कल्याणी वाकडकर यांना चांदीचे जोडवे देण्यात आले. ही बक्षिसे दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांच्या वतीने देण्यात आली. अंतिम फेरीतील सर्व सहभागी महिलांना संस्कार ग्रुपच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. या सोहळ्यात सोमवारी जागर स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम घेण्यात आला. महिलांना जागृत करण्यासाठी संजीवनी महिला पथकाचा ‘जागर स्त्री शक्तीचा’ हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमातून महिलांना नेत्रदान, अन्नदान, रक्तदान, याचबरोबर झाडे लावा झाडे जगवा, पाण्याचा योग्य वापर करा असे अनेक सामाजिक संदेश देण्यात आले. संजीवनी महिला पथकामध्ये सुजया कुलकर्णी, प्रचिती भिष्मुरकर, लीना देशपांडे, कीर्ती मराठे, स्मिता बांधिवडेकर, शुभांगी भोपे, अपर्णा भोपे, शीतल कापशीकर, सिद्धी कापशीकर या महिलांनी सहभाग नोंदविला. त्यांनी पोवाडा, भारुड, शिवाजी जन्म, पाळणा, अंगाई गीत या गीतांच्या माध्यमातून महिलांना जागृत केले. गेल्या पाच वर्षांपासून या पथकाची धुरा वनिता मोहिते या सांभाळत आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला फिरोज मुजावर यांनी त्यांच्या सोबतच्या कलाकारांसह लावण्या सादर केल्या. मंगळवार, दि. २२ डिसेंबरला कोको फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी शाळेत येणारी मुले व गुरुजी यांच्या संवादावर आधारित ‘घंटा शाळेची’ हे हास्यविनोदी नाटक सादर करण्यात आले. शाळेत जाणाऱ्या मुलांना मोबाइल देणे कितपत योग्य आहे. एवढ्या लहान वयात मोबाइल दिल्यावर त्याचे काय परिणाम होतात. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपच्या वापरामुळे मुले गुरुजींना कशी उद्धट उत्तरे देतात, हे या नाटकाद्वारे दाखवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी असे वागू नये म्हणून पालकांना नाटकातून संदेश दिला आहे. ५ मुले, २ मुली व गुरुजी अशा ८ कलाकारांनी यात काम केले. प्रमुख भूमिका नाटकाचे दिग्दर्शक गणेश रणदिवे यांनी केली आहे. नाटकाचे निर्माते सुनील टाटिया, तर लेखक राजेश लोंढे आहेत. (प्रतिनिधी)