शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

महिलांची वाटचाल देशासाठी शुभसंदेश : राम नाईक : मी-प्राचार्य सी. जी. वैद्य ग्रंथ प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 12:19 IST

देशातील हा बदल शिक्षण कार्यप्रणालीत झाला पाहिजे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशाचे राज्यपाल राम नाईक यांनी केले. स्नेहल प्रकाशित बीएमसीसीचे माजी प्राचार्य डॉ. चिंतामणी गणेश वैद्य लिखित ‘मी-प्राचार्य सी. जी. वैद्य’ पुस्तकाचे प्रकाशन नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देराम नाईक यांच्या हस्ते ‘मी - प्राचार्य सी. जी. वैद्य’ पुस्तकाचे प्रकाशन हे आत्मचरित्र नाही, अनुभव : डॉ. गो. बं. देगलूरकर

पुणे : महिला सर्वच क्षेत्रांमध्ये करिअर करीत आहेत. त्यांची उच्च शिक्षण व प्रचंड मेहनतीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरू आहे. हा देशाच्या दृष्टीने एक प्रकारे शुभसंदेश आहे. देशातील हा बदल शिक्षण कार्यप्रणालीत झाला पाहिजे, असे प्रतिपादन  उत्तर प्रदेशाचे राज्यपाल राम नाईक यांनी केले. स्नेहल प्रकाशित व बृहन् महाराष्ट्र कॉलेज आॅफ कॉमर्स (बीएमसीसी)चे माजी प्राचार्य डॉ. चिंतामणी गणेश वैद्य लिखित ‘मी - प्राचार्य सी. जी. वैद्य’ पुस्तकाचे प्रकाशन राम नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. मंदिरस्थापत्य आणि मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटी परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, अरुण निम्हण, स्नेहल प्रकाशनाचे संचालक रवींद्र घाटपांडे उपस्थित होते. डॉ. वैद्य यांच्या ५० वर्षांच्या शिक्षणक्षेत्रातील अनुभवांवर आधारित हा  ग्रंथ आहे. नाईक म्हणाले, ‘‘शिक्षणक्षेत्रातील हा बदल सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. तसेच, उत्तर प्रदेश शिक्षणात मागासलेले राज्य आहे, असे वारंवार सांगितले जाते. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये तिथल्या शिक्षणक्षेत्रात एक  चांगला आणि सकारात्मक बदल जाणवतोय. सर्व विद्यापीठांमध्ये ४५ टक्के विद्यार्थिनी व ५५ टक्के विद्यार्थी आहेत. ज्या मुली महाविद्यालयाच्या पदवीला बसतात, त्यांपैकी ६० ते ६५ टक्के विशेष प्रावीण्य मिळवितात.’’ डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘‘लोकांच्या मोठेपणामुळे मी मोठा झालो नाही, ही वैद्यांची प्रवृत्ती नाही. शिक्षणक्षेत्रात जीवनाला अर्थ देण्याकरिता प्राचार्य वैद्यांनी प्रयत्न केले. हे आत्मचरित्र नाही, अनुभव लिहिले आहेत. आठवणीचे आदर्श पुस्तक कसे असावे त्याचा हे पुस्तक उत्तम नमुना आहे.’’रवी घाटपांडे यांनी प्रास्ताविक केले. श्री. प्रकाश भोंडे यांनी  सूत्रसंचालन केले. डॉ. संजय कंदलगावकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Puneपुणे