शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
3
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
4
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
5
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
6
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
7
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
8
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
9
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
10
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
11
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
12
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
13
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
14
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
15
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
16
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
17
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
18
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
19
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
20
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी

आमदारकीसाठी महिलांकडूनही मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 01:46 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

- सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामध्ये महिलादेखील आघाडीवर असून, शहरातील अनेक मतदारसंघांत महापालिकेतील आजी-माजी पदाधिकारी, नगरसेविकांनी आमदारकीसाठी तयारी सुरू केली आहे.लोकसभेनंतर राज्यात २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आताच सुरू झाली आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिल्याने राजकारणातील महिलांचा राजकारणात वावर चांगला वाढला आहे. आरक्षणामुळे अनेक महत्त्वाच्या पदांवर महिलांना संधी मिळू लागली आहे. यामुळे प्रथमच आमदारकीसाठी महिला इच्छुक उमेदवारांची संख्या देखील वाढली आहे.पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार निवडून आले आहेत. यामध्ये कसबा मतदारसंघातील आमदार व पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव सध्या खासदारकीसाठी चर्चेत आहे. बापट यांना खासदारकीची उमेदवारी मिळाल्यास कसबा मतदारसंघातून उमेदवारीसाठी टिळक प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.सध्या कसबा मतदारसंघ अन्य सर्व मतदारसंघापेक्षा भाजपाला अत्यंत सोपा असल्याची चर्चा आहे. यामुळे भाजपामधून येथे इच्छुकांची संख्यादेखील मोठी आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत टिळक शहरामध्ये सर्वाधिक मतांनी निवडूून आल्या आहेत. त्यामुळे बापटांनंतर कसब्यात मुक्ता टिळकांचे नाव आघाडीवर आहे. तसेच याच मतदारसंघातून काँगे्रसच्या वतीने माजी महापौर कमल व्यवहारे यांनीदेखील जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसेकडून माजी नगरसेवक रूपाली पाटील रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे.>अनेकांनी केली जय्यत तयारीपर्वती मतदारसंघात सध्या भाजपाच्या माधुरी मिसाळ आमदार असून, येथेदेखील इच्छुकांची संख्या वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांनी गेल्या काही महिन्यांपासूनच पर्वतीवर लक्ष केंद्रित केले आहे. कदम सलग तीन वेळा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीचे पद त्यांनी भूषविले आहे. भाजपाने या मतदारसंघात पुन्हा महिला उमेदवार दिल्यास कदम राष्ट्रवादी काँगे्रसकडून पर्वतीसाठी हक्क सांगू शकतात. दरम्यान, येथे भाजपाच्या मंजूषा नागपुरे यादेखील इच्छुक असल्याची चर्चा आहे. खडकवासला मतदार संघात राष्ट्रवादी काँगे्रसकडून पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात विविध कार्यक्रम, आंदोलने त्यांनी केली आहेत. भाजपाच्या मंजूषा नागपुरे खडकवासला मतदारसंघात देखील दावा सांगू शकतात. हडपसर मतदारसंघात देखील महिलांकडून मोर्चेबांधणी सुरू असून, येथे राष्ट्रवादीच्या माजी महापौर वैशाली बनकर आणि नगरसेवक नंदा लोणकर यांनीदेखील पक्षाच्या अन्य इच्छुकांमध्ये आपली छाप उमटवली आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका सुजाता शेट्टी व शिवसेनेच्या पल्लवी जावळे यादेखील इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.