शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

हवेली तहसिलदार कार्यालयातील महिला १५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळयात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 17:42 IST

बालेवाडी येथील जागेची आर.टी.एस. फाईलची छायांकित प्रत देण्यासाठी भोसले यांनी त्यांच्याकडे २५ हजार रूपयेची लाच मागितली होती.

लोणी काळभोर : जागेची आर.टी.एस. फाईलची छायांकित प्रत देण्यासाठी हवेली तहसिलदार कार्यालयातील अभिलेख कक्षातील महिला कोतवाल १५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात सापडली आहे. यामुळे हवेली तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे. 

याप्रकरणी बालेवाडी ( पुणे ) येथील अभिलेख कक्षातील कोतवाल सुवर्णा कटर भोसले ( वय ३४ ) यांना लाच घेताना पकडण्यात आले आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे राजेश बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या जमिनीची यांचे बालेवाडी येथील जागेची आर.टी.एस. फाईलची छायांकित प्रत देण्यासाठी भोसले यांनी त्यांच्याकडे २५ हजार रूपयेची लाच मागितली होती. नंतर तडजोडीअंती १५ हजार रूपये व १ गुंठा जागेची मागणी करून १५ हजार रूपये लाच स्विकारली. 

तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची पडताळणी केली असता भोसले यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आज सापळा रचून सुवर्णा भोसले यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार खडक पोलीस ठाणे, पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई पोलीस उपआयुक्त पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. पुणे युनिट अलका सरग या करत आहेत. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटकWomenमहिला