कोरोना संकट काळात मोलाचे योगदान देणारे आरोग्य विभाग, पोलिस स्टेशन, वनवीभागाच्या महीला कर्मचाऱ्यांना सामाजीक कृतज्ञता म्हणुन सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुन्नर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे होते. तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उज्वला शेवाळे, डॉ. अपर्णा ठिकेकर, डॉ. स्वाती घोरपडे, डॉ. प्रियांका बोरा, डॉ. स्वाती मुरकुटे, डॉ. सुप्रिया कानडे आदी मानीव यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात परीचारीका प्रिती झगडे व सहकारी, पोलिस कर्मचारी मनिषा ताम्हाणे व सहकारी, वनरक्षक मनिषा काळे व सहकारी, तसेच दिव्यांग असुनही राज्यपातळीवर नृत्यनैपुन्य पुरस्कारप्राप्त सोनाली पाटील, डोंबिवली क्वीन ठरलेल्या येण सुंदराबाई घोगरे, कवयत्री सरीता कलढोने, वक्त्या सुनिता वामन, कचरा व्यवस्थापन स्पर्धेच्या विजेत्या छाया जोशी यांना सन्मानित करण्यात आले. प्रतिष्ठानच्या सदस्या राधिका कोल्हे, डॉ. वैशाली गायकवाड, पुनम तांबे, माधुरी म्हस्कर, कविता छाजेड, महानंदा हिरेमठ, उर्मिला थोरवे, छाया वाळुंज, छाया शेवाळे, अनिता ढोबळे, मनिषा लोखंडे, माया खत्री, सुजाता ढोबळे, आशा केदारी, शामा मेहेर, स्मिता हजारी, जोत्स्ना शिंदे, मनिषा तिवारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
फोटो ओळ-तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात परीचारीका, पोलिस कर्मचारी वनरक्षक यांचा सन्मान करण्यात आला