शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनो, पारंपरिक विचारपद्धती बदला

By admin | Updated: March 25, 2015 00:34 IST

बलात्काराबरोबरच कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, घटस्फोट, स्त्री-पुरुष असमानता, असे अनेक प्रश्न स्त्री-पुरुष संघर्षाशी निगडित आहेत.

पुणे : बलात्काराबरोबरच कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, घटस्फोट, स्त्री-पुरुष असमानता, असे अनेक प्रश्न स्त्री-पुरुष संघर्षाशी निगडित आहेत. जवळपास प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात यापैकी एकतरी प्रश्न डोकावतोच, यावर उत्तर शोधण्यासाठी आपल्या पारंपरिक विचारपद्धती सोडून, नव्या वाटा शोधणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध लेखिका कुसुम चोप्रा यांनी व्यक्त केले.कुसुम चोप्रा यांनी लिहिलेल्या ‘निर्भया अँड आदर्स हू डेअर्ड’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. या पुस्तकाविषयी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महिलांच्या विविध प्रश्नांवर भाष्य करणारे ‘निर्भया अँड आदर्स हू डेअर्ड’ हे पुस्तक असून, यामध्ये विविध स्तरांतील २५ महिलांशी निगडित कथांचा समावेश आहे. या पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीस्थित विटास्टा पब्लिशिंग या संस्थेने केले आहे.चोप्रा म्हणाल्या, ‘‘आपल्या समाजामध्ये महिलांशी निगडित अजूनही असंख्य समस्या आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी जुनी विचारसरणी सोडून नव्या वाटा चोखाळणे आवश्यक आहे. यासाठी स्त्रियांनाही स्वत:ची विचारपद्धती बदलण्याची गरज आहे. असे झाल्यास आपल्याला समाजामध्ये अधिक सकारात्मक बदल दिसून येतील.’’ (प्रतिनिधी)समानतेची शिकवण मिळावी४स्त्रियांना पुरुषांइतकीच समानतेची वागणूक मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी घरातील स्त्रियांनीच पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी घरातील मुलांना-पुरुषांना समानतेची शिकवण दिल्यास, भविष्यामध्ये स्त्री-पुरुषांमधील दरी कमी होण्यास मदत होऊ शकते, असे कुसुम चोप्रा म्हणाल्या.१ पुस्तकाविषयी बोलताना चोप्रा म्हणाल्या, पुस्तकातील २२ कथा म्हणजे २५ विविध स्त्रियांनी आपल्या आयुष्यात थोडेफार सुख व समाधान प्रस्थापित करण्यासाठी दिलेला हा लढा आहे. समाजात जगताना आलेल्या अनुभवांचे हे कथन आहे. यामध्ये स्त्रियांशी निगडित असणाऱ्या समस्यांच्या सर्व बाजू मांडण्यात आल्या आहेत. २ या सर्व कथांचा शेवट हा सकारात्मक आहे, कारण यामधून समाजामध्ये एक आशावाद तयार व्हावा, सकारात्मकता तयार व्हावी, एवढीच माझी इच्छा आहे.३ या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी ‘आय अ‍ॅम निर्भया’ या विषयावर लेखन स्पर्धा घेण्यात आली होती. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता याच धर्तीवर पुस्तकातील काही कथांवर आधारित लघुचित्रपट स्पर्धा मे महिन्यात घेण्यात येणार असल्याचेही चोप्रा यांनी सांगितले.