पुणे : बलात्काराबरोबरच कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, घटस्फोट, स्त्री-पुरुष असमानता, असे अनेक प्रश्न स्त्री-पुरुष संघर्षाशी निगडित आहेत. जवळपास प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात यापैकी एकतरी प्रश्न डोकावतोच, यावर उत्तर शोधण्यासाठी आपल्या पारंपरिक विचारपद्धती सोडून, नव्या वाटा शोधणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध लेखिका कुसुम चोप्रा यांनी व्यक्त केले.कुसुम चोप्रा यांनी लिहिलेल्या ‘निर्भया अँड आदर्स हू डेअर्ड’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. या पुस्तकाविषयी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महिलांच्या विविध प्रश्नांवर भाष्य करणारे ‘निर्भया अँड आदर्स हू डेअर्ड’ हे पुस्तक असून, यामध्ये विविध स्तरांतील २५ महिलांशी निगडित कथांचा समावेश आहे. या पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीस्थित विटास्टा पब्लिशिंग या संस्थेने केले आहे.चोप्रा म्हणाल्या, ‘‘आपल्या समाजामध्ये महिलांशी निगडित अजूनही असंख्य समस्या आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी जुनी विचारसरणी सोडून नव्या वाटा चोखाळणे आवश्यक आहे. यासाठी स्त्रियांनाही स्वत:ची विचारपद्धती बदलण्याची गरज आहे. असे झाल्यास आपल्याला समाजामध्ये अधिक सकारात्मक बदल दिसून येतील.’’ (प्रतिनिधी)समानतेची शिकवण मिळावी४स्त्रियांना पुरुषांइतकीच समानतेची वागणूक मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी घरातील स्त्रियांनीच पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी घरातील मुलांना-पुरुषांना समानतेची शिकवण दिल्यास, भविष्यामध्ये स्त्री-पुरुषांमधील दरी कमी होण्यास मदत होऊ शकते, असे कुसुम चोप्रा म्हणाल्या.१ पुस्तकाविषयी बोलताना चोप्रा म्हणाल्या, पुस्तकातील २२ कथा म्हणजे २५ विविध स्त्रियांनी आपल्या आयुष्यात थोडेफार सुख व समाधान प्रस्थापित करण्यासाठी दिलेला हा लढा आहे. समाजात जगताना आलेल्या अनुभवांचे हे कथन आहे. यामध्ये स्त्रियांशी निगडित असणाऱ्या समस्यांच्या सर्व बाजू मांडण्यात आल्या आहेत. २ या सर्व कथांचा शेवट हा सकारात्मक आहे, कारण यामधून समाजामध्ये एक आशावाद तयार व्हावा, सकारात्मकता तयार व्हावी, एवढीच माझी इच्छा आहे.३ या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी ‘आय अॅम निर्भया’ या विषयावर लेखन स्पर्धा घेण्यात आली होती. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता याच धर्तीवर पुस्तकातील काही कथांवर आधारित लघुचित्रपट स्पर्धा मे महिन्यात घेण्यात येणार असल्याचेही चोप्रा यांनी सांगितले.
महिलांनो, पारंपरिक विचारपद्धती बदला
By admin | Updated: March 25, 2015 00:34 IST