शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महिलेने अंतर्वस्त्रातून आणले ३ किलो सोने

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 23:25 IST

जेट एअरवेजच्या विमानाने आलेल्या महिलेकडून तस्करी करून आणलेले ९८ लाख ८३ हजार रुपयांचे ३ किलो ४१ ग्रॅम सोने सीमा शुल्क विभागाने गुरुवारी पकडले.

पुणे : जेट एअरवेजच्या विमानाने आलेल्या महिलेकडून तस्करी करून आणलेले ९८ लाख ८३ हजार रुपयांचे ३ किलो ४१ ग्रॅम सोने सीमा शुल्क विभागाने गुरुवारी पकडले.रेहना फैझान अहमद खान (रा. कुर्ला, मुंबई) या महिलेला अटक केली आहे. तिने हे सोने अंगातील अंतर्वस्त्रांमध्ये लपवून आणले होते.याबाबत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उपायुक्त भारत नवले यांनी सांगितले की, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी सकाळी आलेले जेट एअरवेजच्या विमानातून रेहना खान या उतरल्या. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांची झडती घेण्यात आली. तेव्हा त्यांनी अंगात अंतर्वस्त्रांमध्ये सिंथेटिक रबर पेस्टच्या आत सोने लपविल्याचे लक्षात आले, अशी सहा पॅकेट आढळून आली. त्यातील सोने बाजूला काढल्यानंतर ते २४ कॅरेट चे ३ किलो ४१ ग्रॅम इतक्या वजनाचे असल्याचे निष्पन्न झाले. त्याची किंमत ९८ लाख ८३ हजार २५० रुपये असून ते जप्त करण्यात आले आहे.त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी आपल्याला हे शाहिन नावाच्या एकाने दिले असून पुणे विमानतळावर त्यांचा माणूस ते घेण्यासाठी येईल, असे सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रेहना खान यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.सीमा शुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुण्यातील कॅम्प भागातून एकाकडून ८९० ग्रॅम नार्कोटिक्स जप्त केले आहे.