शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

बारामती-फलटण महामार्गावर टँकर चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे अपघातात महिला थोडक्यात बचावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 17:23 IST

महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा चौक ओलांडताना पादचारी देखील धास्तावलेले असतात

सांगवी : बारामती-फलटण महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा चौक ओलांडताना पादचारी देखील धास्तावलेले असतात. शिरवली,कांबळेश्वर मार्गे येणारी-जाणारी वाहने या चौकातून वळतात. रस्त्याने येणारी वाहने भरधाव जातात. त्यांच्या अनियंत्रित वेगामुळे अनेकदा अपघात होतात.

बारामती -फलटण रस्त्यावर रस्ते अपघातात झालेली वाढ चिंताजनक असून अवघ्या महिनाभरात ठिकठिकाणी झालेल्या अपघातांत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकीवरून निघालेल्या जोडप्याची सांगवी येथील मुख्य चौकात वळण घेऊन समोरून आलेल्या रिक्षाला धडक देऊन झालेल्या अपघातात टँकर चालकामुळे महिला थोडक्यात बचावली आहे. 

बारामती -फलटण महामार्गावर सांगवीतील चौकात बुधवारी (दि. १३ ) रोजी दहा वाजण्याच्या सुमारास फलटण तालुक्यातील पूसेगाव वरून दुचाकीवर बारामतीकडे निघालेले मध्यम वयाचे जोडपे मुख्य चौकातील सांगवी गावातून वळण घेऊन समोरून आलेल्या रिक्षाला जोरदार धडकले. यावेळी हे जोडपे उडून खाली पडले. त्यावेळी वाहन चालक पती एका बाजूला उडून पडला. तर मागे बसलेली पत्नी बारामतीवरून फलटणच्या दिशेने समोरून भरधाव आलेल्या टँकर समोर उडून आडवी गेली. यावेळी प्रसंगावधान दाखवत टँकर चालकाने ब्रेक दाबून ट्रक जागेवर थांबला गेला. यावेळी टँकर व महिलेच्या मध्ये काही इंचभर अंतराचा फरक राहिला. 

यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला गेला. यावेळी वाहन चालकाच्या कानाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत होता. तर महिलेच्या कपाळावर मार लागून रक्तस्त्राव झाला. यावेळी अपघात होताच क्षणी संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष राहुल तावरे,सुधीर तावरे,संतोष जगदाळे यांच्यासह गावातील तरुणांनी या गंभीर दुखापत झालेल्या जोडप्याला शेजारीच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारकामी दाखल केले होते. मात्र,या गंभीर अपघातात हे जोडपे सुखरूप असल्याचे पाहून ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

टॅग्स :Baramatiबारामतीphaltan-acफलटणAccidentअपघातhospitalहॉस्पिटलWomenमहिला