शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पुण्यात हेल्मेटसक्ती जोरात सुरू, दिवसभरात ७४९० वाहनचालकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 22:14 IST

यापूर्वी वाहतूकीचे नियम मोडला तर त्या नियमभंगाबरोबरच विना हेल्मेटचा दंड केला जात होता़.

ठळक मुद्दे११ महिन्यात ३४ हजार ४९९ : डिसेंबर महिन्यात ३१ हजार ५५७ कारवाया दुचाकी वाहनचालकांवरही सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई सुरु

पुणे : शहर पोलीस दलाने १ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती जोरदारपणे राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी हेल्मेट न घालता दुचाकी चालविणा-या ७ हजार ४९० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरात हेल्मेटसक्ती नसली तरी कारवाई करणार असे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यानुसार नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर ही कारवाई केली आहे. २००३ - ०४ मध्ये उच्च न्यायालयाने पुणेपोलिसांना वाहतूक सुरक्षेविषयी फटकारल्यानंतर तत्कालीन पोलीस उपायुक्त रवींद्र सेनगावकर यांनी एकाच दिवशी सुमारे ५ हजार दुचाकी वाहनचालकांवर कारवाई केली होती. त्यावेळी शहरात एकच गहजब माजला होता. त्यानंतर पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून हेल्मेटविरोधात मोर्चा काढला होता. त्यावेळेपेक्षा यंदा नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये चौकाचौकात उभारण्यात आलेल्या सीसीटीव्हीमार्फत सुमारे २ हजार दुचाकी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित कारवाई ही वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध चौकात केली आहे. या अगोदर वाहतूक नियमांचा भंग केल्यास त्याच्याबरोबर हेल्मेटची कारवाई केली जात होती. ६ डिसेंबरपासून वाहतूक पोलिसांनी थेट हेल्मेट नसलेल्या वाहनचालकांवर कारवाई सुरू केली असून संपूर्ण डिसेंबर महिन्यात ३१ हजार ५५७ जणांवर कारवाई केली आहे. गेल्या वर्षीच्या शेवटच्या काही दिवसात तर दररोज ३ ते ५ हजार जणांवर कारवाई करण्यात येत होती. ३१ डिसेंबरला ४ हजार ८६२ जणांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर १ जानेवारीला तब्बल ७ हजार ४९० जणांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली आहे. त्यातील बहुसंख्य दुचाकी वाहनचालकांकडून ईचालनमार्फत ५०० रुपये दंडाची रक्कम वसुल करण्यात आली आहे़ यापुढेही ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे सध्या हेल्मेट वापरणा-या दुचाकीस्वारांची संख्या रस्त्यावर लक्षणीयरित्या वाढली असून अनेक चौकात सिग्नलला थांबलेल्यांमध्ये पूर्वी हेल्मेट घातलेले २ ते ३ दुचाकीस्वार दिसत असत. आता नेमके उलट चित्र दिसत असून सिग्नलला थांबलेल्यांमध्ये २ -३ दुचाकीस्वार हेल्मेटशिवाय दिसून येतात. त्यांच्यावरही सीसीटीव्हीमार्फत कारवाई केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसPoliceपोलिस