शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

रस्त्याचे श्रीलंकेतही कौतुक, स्मार्ट सिटीची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 03:51 IST

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने त्यांच्या औंध, बाणेर, बालेवाडी या विशेष क्षेत्रातील औंध परिसरातल्या ब्रेमेन चौक ते परिहार चौक हा फक्त अर्धा किलोमीटरचा रस्ता असा तयार केला की त्याचे थेट श्रीलंकेतच कौतुक झाले.

पुणे -  स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने त्यांच्या औंध, बाणेर, बालेवाडी या विशेष क्षेत्रातील औंध परिसरातल्या ब्रेमेन चौक ते परिहार चौक हा फक्त अर्धा किलोमीटरचा रस्ता असा तयार केला की त्याचे थेट श्रीलंकेतच कौतुक झाले. आता या परिसरातील विविध अंतरांचे एकूण ९ रस्ते असेच तयार केले जाणार आहेत. विशेष म्हणजे हे काम महापालिकेच्याच पथ विभागाने केले आहे.रस्ता होण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या दुकानदारांना थोडा त्याग करावा लागला आहे. मात्र तो केला हे फारच छान झाले, अशीच आता त्यांची व त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांचीही प्रतिक्रिया आहे. वाहने चालवणारेही खूश आहेत. पायी चालणाºयांना तर पदपथ म्हणजे प्लाझाच वाटत आहे. त्याशिवाय व्हिलचेअरवर असणारे रुग्ण, बाबागाडीत आईवडिलांबरोबर फिरणारी लहान मुले, बॅगा वाहून नेणारे प्रवासी, थोडे चालले की दम लागून बसण्याची गरज असणाºया वयस्क व्यक्ती असे सगळेच या रस्त्यावर बेहद्द खूश आहेत.हा रस्ताही याच परिसरातील अन्य सर्वसामान्य रस्त्यांप्रमाणेच गर्दीचा, वाहनकोंडीचा व पदपथावर पायही ठेवता येणार नाही असाच होता. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ते स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ असताना या रस्त्याची कल्पना मांडली होती. त्यानंतर महापालिकेतच अतिरिक्त आयुक्त असलेले राजेंद्र जगताप हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. त्यांनी प्रसन्न देसाई यांना रस्त्याचे आरेखन करण्याचे काम दिले. त्यांनी आयबीआय कंपनीच्या साह्याने रस्त्याची पुनर्रचना केली. रस्ते व्यवस्थापनाचा एक आदर्श रस्ता त्यातून साकार झाला आहे.एकूण ३० मीटर लांबीच्या या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ६ मीटर असे एकूण १२ मीटरचे प्रशस्त पदपथ आहेत. त्यातले तीन मीटर रस्त्याच्या बाजूच्या दुकानदारांनी दिले आहेत. त्यावरचा एकही वृक्ष पाडण्यात आला नाही. उलट तीन मीटरच्या रेघेत वृक्ष व तीन मीटरच्या रेघेत पदपथ अशी रचना करण्यात आली. प्रत्येक वृक्षाभोवती दगडी बांधणीचा पार करण्यात आला आहे. त्यावर अगदी निवांत बसता येते. संपूर्ण पदपथ एकाच लेवलमध्ये आहे. त्यामुळे त्यावरून व्हीलचेअरवर बसून रुग्णांना नेता येते, तसेच बाबागाडी चालते, प्रवाशांना त्यांचे साहित्य असलेल्या बॅगा वाहून नेता येतात, गृहिणींना त्यावरून शॉपिंग ट्रॉली नेता येते. त्यामुळे थोड्या अंतरावरच्या कामासाठी म्हणून दुचाकी वाहनाचा वापर करण्याचे प्रमाण या भागात एकदम कमी झाले आहे.गतिरोधकांच्या १२ मीटर आधीचा रस्ता दगडी फरसबंदीचा तयार झाला आहे. त्यामुळे वाहनांचा वेग गतिरोधक येण्याआधीच कमी होतो. संपूर्ण रस्ता काँक्रिटचा तयार करून घेण्यात आला आहे. अर्धा किलोमीटरच्या या रस्त्याला कुठेही खड्डा नाही किंवा नको असलेला चढ अथवा उतारही नाही. असाच पुढचा अर्धा किलोमीटर अंतराचा रस्ता याच पद्धतीने तयार होत आला आहे. याशिवाय आनंद पार्क, नागरस रोड, महादजी शिंदे रोड हेही असेच तयार करण्यात येणार आहेत.महापालिकेच्या पथविभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत व त्यांच्या सहकाºयांनी या रस्त्याचे काम करून घेतले आहे, अशी माहिती प्रसन्न देसाई यांनी दिली. राजेंद्र जगताप यांनी सांगितले की आदर्श रस्ता व्यवस्थापनाचे पहिले पारितोषिक इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्चर अ‍ॅण्ड इंटिरिअर डिझाइन यांनी या रस्त्याला दिले. श्रीलंकेत झालेल्या परिषदेत परवडणाºया दरातील रस्ता असे त्याचे कौतुक झाले. आता विशेष क्षेत्रातील अन्य रस्तेही असेच केले जाणार आहेत.शहरातील रस्ते मात्र खडबडीत1स्मार्ट सिटीच्या विशेष क्षेत्रातील रस्ते असे होत असताना पुणे शहरातील रस्ते मात्र खडबडीत, खड्डेयुक्त व कसलाही आकारउकार नसणारे का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. जंगली महाराज रस्त्याचा बालगंधर्व ते डेक्कन असा भाग पुणे महापालिकेने त्याच पद्धतीने तयार केला असून, पुण्यातही आता सर्व प्रमुख रस्ते असेच करण्यात येणार असल्याचे पथ विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत यांनी सांगितले. त्याचे काम सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली.प्रत्यक्ष रस्ता तयार करतानाही फार बारकाईने विचार करण्यात आला आहे. बहुतेक रस्त्यांचे दुभाजक सिमेंट काँक्रिटचे तयार करतात. त्यात बरीच जागा जाते. या रस्त्यावरचा दुभाजक वृक्षराजीने तयार केला आहे. वाहने एकीकडून दुसरीकडे जाऊ नयेत यासाठी दुभाजकाभोवती स्टिलची जाळी बसवण्यात आली आहे. या रचनेमुळे रस्त्याची रुंदी वाढली. रस्त्याच्या मध्यभागात तसेच पदपथावरही दिवे आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी चांगला प्रकाश असतो.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या