शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आयटी पार्कमध्ये वादळी वाऱ्याने उडाली दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:10 IST

हिंजवडी : दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासाह अवकाळी पावसाने आयटी पार्क परिसरात अक्षरशः दाणादाण उडाली. फेज दोनमधील ...

हिंजवडी : दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासाह अवकाळी पावसाने आयटी पार्क परिसरात अक्षरशः दाणादाण उडाली. फेज दोनमधील मुख्य रस्त्यालगत असलेले एक महाकाय होर्डिंग कोसळले, तर माणमध्ये झाड उन्मळून पडले. दोन्ही घटनांमध्ये केवळ दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टाळली. मात्र, वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हिंजवडी, माण परिसरात सोमवारी (दि. २२) दुपारी अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने आयटी पार्क परिसरात अनेक फ्लेक्स फाटले, फेज दोनमधील मुख्य रस्त्यावर विप्रो सर्कलजवळ महाकाय होर्डिंग कोसळल्याने त्याखाली एक चारचाकी आणि अनेक दुचाकी अडकून पडल्या होत्या. अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडल्याने मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मोठा आवाज झाल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून लक्ष्मण बोडके, निखिल बोडके, रवींद्र बोडके, स्वप्निल बोडके यांनी तत्काळ धाव घेत वाहतूक सुरळीत केली. तसेच अडकलेल्या दुचाकी बाहेर काढण्यासाठी मदत केली.

दुसऱ्या घटनेत वादळी वाऱ्यामुळे माण रस्त्यावर भरणे वस्तीजवळ एक झाड उन्मळून पडले. नवनाथ पारखी, हाणमंत पारखी, संदीप पारखी, शरद बाराहाते यांसह स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान दाखवत झाड बाजूला केले. दरम्यान, अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जनावरांचा चारा भिजला, परिसरात अनेक ठिकाणी गहू, ज्वारी काढणी हंगाम सुरू आहे. धान्य भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या घटनेमुळे आयटीनगरी परिसरातील अनधिकृत महाकाय होर्डिंगचा मुद्दा, पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने याबाबत ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.

फोटो : अचानक आलेल्या वादळी पावसामुळे विप्रो सर्कलजवळील महाकाय होर्डिंग कोसळल्याने वाहनांचे नुकसान झाले तर, दुसऱ्या छायाचित्रात माण रस्त्यावर झाड उन्मळून पडले.