शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पालखीमार्ग रस्तारुंदीकरण : झाडांची होणार कत्तल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 02:18 IST

जगद्गुरू श्रीसंत तुकाराममहाराज पालखीमार्ग रस्तारुंदीकरणाच्या कामाला काही महिन्यांत सुरुवात होणार आहे. पालखीमार्ग चौपदरी मंजूर असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बारामती ते इंदापूर रस्त्यावर अनेक जातींची नानाविध गर्द हिरवीगार लाखो मोठमोठी झाडे असून, ती आगामी काळात राहतील की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

वालचंदनगर -  जगद्गुरू श्रीसंत तुकाराममहाराज पालखीमार्ग रस्तारुंदीकरणाच्या कामाला काही महिन्यांत सुरुवात होणार आहे. पालखीमार्ग चौपदरी मंजूर असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बारामती ते इंदापूर रस्त्यावर अनेक जातींची नानाविध गर्द हिरवीगार लाखो मोठमोठी झाडे असून, ती आगामी काळात राहतील की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे. रस्तारुंदीकरणाच्या प्रकल्पामुळे या डेरेदार आणि जुन्या वृक्षांवर कुºहाड कोसळणार आहे.जाणाऱ्या-येणाºया प्रवाशांना थंडगार सावलीला मुकावे लागणार आहे. तर, ओसाड माळरानाचे स्वरूप या रस्त्याला येणार आहे. देहू-आळंदीपासून इंदापूर तालुक्याच्या मार्गावर होणाºया रस्त्याच्या अडथळ्यामुळे शासनाने हा रस्ता चौपदरी करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला आहे. रस्त्याची पाहणी करून जागोजागी लाल रंगाच्या खुणा करण्यात आल्या आहेत. यात रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतकºयांना जबरदस्त फटका बसणार असून, जवळजवळ १० ते २० फूट शेतीतून हा रस्ता जाणार असल्यामुळे रस्त्याच्या कडेला असणाºया शेतकºयांनी धास्ती घेतली आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला असंख्य गावे आहेत. त्यात गोरगरीब, अल्पसंख्याक, मागासलेले, भटक्या जमातीच्या लोकांच्या घरांवर वरवंटा फिरणार आहे. या लोकांच्या घराची राहण्याची सुविधा करणे तितकेच गरजेचे आहे. शेतकºयांना जमिनीचा योग्य मोबदला मिळणे गरजेचे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेकडो वर्षापूर्वी रस्त्याच्या कडेला लागवड करण्यात आलेले वृक्ष असल्याने त्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहे. काही महिन्यांत रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे चावडीवर गावागावांत चर्चा रंगताना दिसत आहे.पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पाठीमागे रस्ता चौपदरी करण्यास सुरुवात होणार असल्याने हे बारामती-इंदापूर रस्त्याच्या कडेला असलेले वृक्ष काही दिवसांपुरतेच आपल्यासोबत असल्याचे जाणाºया-येणाºया प्रवाशांतून बोलले जात आहे.या झाडाच्या दोन्ही बाजूंना रस्ता तयार करून वृक्ष मध्यभागी ठेवल्यास लाखो झाडांना जीवदान मिळणार असल्याचे जाणकार सांगतात अथवा झाडाची प्लांट करून लावल्यास असंख्य झाडे वाचतील.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या