शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

... तर पिंपरी महापालिकेतील ‘अनाजीपंतांना’ हत्तीच्या पायाखाली देऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 11:20 IST

शिरूरचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर खासदार कोल्हे यांनी महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले आहे. कोल्हे यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली.

पिंपरी : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या भ्रष्टाचार करणाऱ्यांवर शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शरसंधान साधले. ‘‘शंभूराजांनी स्वराज्यद्रोह करणाऱ्या अनाजीपंतांना हत्तीच्या पायाखाली दिले होते. पालिकेतील भ्रष्टाचार करणाऱ्या व चुकीचे काम करणारे सिद्ध झाल्यास, वेळ पडल्यास त्यांनाही हत्तीच्या पायाखाली द्यायला हवे, असा गर्भित इशारा  कोल्हे यांनी दिला आहे.शिरूरचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर खासदार कोल्हे यांनी महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले आहे. कोल्हे यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली. बैठकीची वेळ ही चारची होती. सुमारे दीड तास उशिराने खासदार महापालिकेत आले. या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते नाना काटे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी महापौर मंगला कदम आदी उपस्थित होते. अभिनेते आणि नेते डॉ. कोल्हे हे महापालिकेत येत असल्याने चाहत्यांनी महापालिका भवनातील तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर गर्दी केली होती. तासाभराच्या बैठकीत कचराप्रश्न, रेडझोनमधील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, स्मार्ट सिटीतील कामे, प्राधिकरण बांधकाम नियमितीकरण, एचए कंपनी खासगीकरण, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प याविषयी चर्चा केली. तसेच केंद्राच्या योजनांसाठी काही मदत लागल्यास मला सांगा, असे आवाहनही आयुक्तांना केले. महापालिकेत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप होत आहे. महापालिकेतील या अनाजीपंतांचे आपण काय करणार? या प्रश्नावर डॉ. कोल्हे स्मितहास्य करून म्हणाले, ‘‘शंभूराजांनी स्वराज्यद्रोह करणाऱ्या अनाजीपंतांना हत्तीच्या पायाखाली दिले होते. चुकीची कामे आणि भ्रष्टाचार करणारे सिद्ध झाल्यास त्यांनाही हत्तीच्या पायाखाली देऊ.’’

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCorruptionभ्रष्टाचार