शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

निवासी अतिक्रमणे नियमित होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 01:40 IST

सरकारी जागांवरील १९९५ पूर्वीच्या निवासी अतिक्रमणांचा ग्रामीण भागातील तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. ग्रामविकास विभागाने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी घेतलेल्या निर्णयामुळे निवासी भागातील अतिक्रमण नियमित करण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

नीरा - सरकारी जागांवरील १९९५ पूर्वीच्या निवासी अतिक्रमणांचा ग्रामीण भागातील तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. ग्रामविकास विभागाने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी घेतलेल्या निर्णयामुळे निवासी भागातील अतिक्रमण नियमित करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. यासाठी ग्रामविकास विभाकडून ४ एप्रिल २००२ च्या महसूल विभागाच्या शासन निर्णयाचा संदर्भ घेण्यात आला होता. १९९५ पूर्वीच्या अतिक्रमणांची नोंद घेण्यात यावी, अतिक्रमण नियमित करण्याचे प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांकडून उपविभागीय स्तरावर पाठविण्यात यावेत, असे पत्र दौंड-पुरंदरच्या उपविभागीय अधिकाºयांनी पुरंदर व दौंडच्या तहसीलदारांना; तसेच अनाधिस्त सर्व गटविकास अधिकाºयांना दिले आहेत. त्यामुळे ही अतिक्रमणे नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदने देऊन अतिक्रमण नियमित व्हावे, अशी मागणी अनेकांनी केली. महसूल विभागाच्या गाव नमुना नंबर १ इ या गावपातळीवरील रजिस्टरला अतिक्रमणांच्या नोंदी नसल्याचे कारण पुढे करत मनमानी अर्थ लावत अधिकाºयांनी अतिक्रमण नियमित करण्याच्या मागण्यांना केराच्या टोपल्या दाखवल्या. या ना त्या कारणाने अतिक्रमण नियमित करायचे नाही, अशीच भूमिका अधिकाºयांनी घेतल्याने गोरगरीब लोकांचा प्रश्न तसाच ऐरणीवर वर्षानुवर्षे राहिला. आता मात्र ग्रामविकास विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे हीअतिक्रमणे नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या अतिक्रमणांच्या नोंदी अतिक्रमणाच्या रजिस्टरला घेण्याबाबत तसेच गटविकास अधिकाºयांच्या मार्फत प्रस्ताव पुढे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुळुंचे (ता. पुरंदर) येथील नरवीर राजे उमाजी नाईक सामाजिक विकास ट्रस्ट, श्रावणबाळ मत-पिता सेवा संघामार्फत १९९५ पूर्वीची अतिक्रमणे नियमित करण्यासाठी शासन स्तरावर गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्याला यश आले आहे.२७ सप्टेंबर १९९९च्या शासन निर्णयात १ जानेवारी १९८५ पूर्वीची अतिक्रमणे नियमित करण्याचे, तर ४ एप्रिल २००२ रोजी १ जानेवारी १९९५ पूर्वीची अतिक्रमणे नियमित करण्याचे धोरण आखण्यात आले. यात अतिक्रमित जागांचे ले-आउट करण्यासाठी तालुकास्तरावर ग्रामीण भागात तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे; तसेच महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याची तरतूद करण्यात आली; मात्र बहुतांशी ठिकाणी या समित्याच स्थापन झाल्या नाहीत. त्यामुळे अतिक्रमण नियमित करण्याचे धोरण व समित्या कागदावरच राहिल्या. यानंतर या निर्णयाचा; तसेच औरंगाबाद खंडपीठाने २३ जून २०१५ रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने १९९५ पूर्वीची अतिक्रमणे नियमित व्हावीत, यासाठी सामाजिक संघटनांनी प्रयत्न केले. या प्रयत्नांनी तालुकास्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या, काही ठिकाणी या समित्यांची बैठक दाखविण्यात आली; मात्र राज्यभरात एकही ठिकाणी अधिकाºयांनी ले-आउट केले नाही. याउलट १२ जुलै २०११ च्या निर्णयाचा आधार घेत प्रशासनाने अतिक्रमण नियमित करता येणे शक्य नसल्याची उत्तरे दिली.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या