शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची मुदतवाढ घेणार नाही - बी.पी. सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 04:02 IST

माझा एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा काळ दोन महिन्यांत संपुष्टात येत आहे.

पुणे : माझा एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा काळ दोन महिन्यांत संपुष्टात येत आहे. संस्थेचे दोनदा अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली. एफटीआयआयचा माजी विद्यार्थी असल्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊन काम करता आले याचे समाधान आहे. पण आता बास झाले असे वाटते. अध्यक्षपदासाठी मुदतवाढ मिळाली, तरी घेणार नसल्याचे एफटीआयआयचे अध्यक्ष बी. पी. सिंग यांनी सांगितले.जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन, एफटीआयआय आणि एसआरएफटीआयआय च्या संयुक्त प्रवेश शुल्कासह वार्षिक शैक्षणिक शुल्कातील वाढीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी सुरू केलेले उपोषण यापार्श्वभूमीवर बी. पी. सिंग यांच्याशी ‘लोकमत’ ने संवाद साधला. ते म्हणाले, ‘एफटीआयआयमध्ये आमच्या काळातही विद्यार्थ्यांची आंदोलने व्हायची. अभिनय आणि दिग्दर्शन विभागाच्या विद्यार्थ्यांमध्ये भांडण व्हायची. दिग्दर्शनाच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अधिकतर स्थानिक असायचे. त्यांची भाषा चांगली असायची, त्यांची अभिव्यक्ती उत्तम होती. त्यामुळे त्यांचा वरचष्मा अधिक होता. त्यावेळची कारणे वेगळी होती. आताच्या काळात विद्यार्थी शुल्कवाढीविरोधात आंदोलन करीत आहेत. विद्यार्थी स्वत:साठी नव्हे, तर इतर विद्यार्थ्यांसाठी लढत आहेत. म्हणून मी त्यांचा आदर करून त्यांच्याशी चर्चा केली. माझ्यापरीने मी प्रयत्न केले. जिथे विद्यार्थी आहेत, तिथे प्रश्न हे असतातच. ते चर्चेतूनच सोडविले गेले पाहिजेत.’एफटीआयआयमध्ये ‘विजय तेंडुलकर राईटिंग अकादमी’ स्थापन करण्यात आली असून, यामध्ये केवळ लेखन शिकविले जाईल. आगामी काळात एका विद्यार्थ्याला सहा अभ्यासक्रम शिकविण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत. सहा महिन्यात एक कॉम्पॅक्ट ‘फिल्म मेकर’ म्हणून तो बाहेर पडू शकेल, असेही सिंग यांनी सांगितले.