शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

येवलेवाडी विकास आराखड्यासंदर्भात चुकीचे काही होऊ देणार नाही : संजय काकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 20:47 IST

पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, त्यामुळे कोणी काही केले म्हणून तसेच होईल असे नाही, प्रशासनाने तयार केलेलाच आराखडा मंजूर व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार आहे..

ठळक मुद्देप्रशासकीय समितीने तयार केलेला आराखडाच मंजूर व्हायला हवानियोजन समितीत असलेल्या भाजपाच्या सदस्यांनी आराखड्यात बराच बदल केला असल्याची चर्चा

पुणे: महापालिकेत समाविष्ट झालेल्या येवलेवाडी विकास आराखड्यासंदर्भात बरेच काही चुकीचे झाले असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यात चुकीचे काहीही होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे प्रशासनाने अगदी सुरूवातीला तयार केलेल्या आराखड्यालाच मंजूरी देण्याची मागणी करणार आहोत असे भारतीय जनता पाटीर्चे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी सांगितले.आमदार योगेश टिळेकर यांनी या आराखड्यातील बदलांसाठी भेट म्हणून मर्सिडीज गाडी घेतल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी राजकीय धुरळा उडवून दिला आहे. त्याआधी पालकमंत्री गिरीश बापट तसेच भाजपाच्या अन्य काही आमदारांच्या दबावातून नियोजन समितीत असलेल्या भाजपाच्या सदस्यांनी आराखड्यात बराच बदल केला असल्याची चर्चा होती .  त्यात आता भाजपाचेच खासदार काकडे यांनी भर घालत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. काकडे यांनी कोणाचे नाव घेतले नाही, मात्र पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, त्यामुळे कोणी काही केले म्हणून तसेच होईल असे नाही, प्रशासनाने तयार केलेलाच आराखडा मंजूर व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार असल्याचे यांनी सांगितले.काकडे म्हणाले, माझ्याकडे त्या परिसरातील काही शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे. अन्य ठिकाणचे आरक्षण बदलून त्यांच्या जागेवर आरक्षण टाकण्यात आले असे त्यांचे म्हणणे आहे. प्रशासकीय समितीने तयार केलेला आराखडाच मंजूर व्हायला हवा. त्यांच्यापेक्षा कोणीही राजकारणी हुशार असूच शकत नाही. सध्या आहे तसा नियोजन समिती व शहर सुधारणा समितीने बदल केलेला आराखडा मंजूर झाला तर तो पुणेकरांचा विश्वासघात ठरेल. त्यामुळे प्रशासनाने तयार केलेलाच आराखडा चांगला आहे व तोच मंजूर झाला तर पक्षासाठी चांगले असेल. अन्यथा कोणा एकाच्या आग्रहासाठी पक्षाची प्रतिमा खराब होईल व तसे कधीही होऊ देणार नाही................महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांना पत्र देऊन प्रशासनाचा, शहर सुधारणा समितीचा व नियोजन समितीचा असे तिन्ही आराखडे मागवले आहेत व त्यांच्यातील बदलांचीही माहिती मागवली आहे. नगरविकास विभागाचे सचिव नितीन करीर यांच्याकडे या तिन्ही आराखडट्यांची चर्चा करू, त्यासाठी आराखडा तयार करणाऱ्या प्रशासकीय समितीच्या सदस्यांनाही बोलावले जाईल. या सगळ्याचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांकडे देऊन त्यांच्याकडे प्रशासनाच्या आराखडट्याचा आग्रह धरण्यात येईल. संजय काकडे, सहयोगी खासदार, भाजपा.

टॅग्स :PuneपुणेSanjay Kakdeसंजय काकडेBJPभाजपाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस