शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी आदेश दिल्यास आंबेगावमधून लढणार; देवदत्त निकम यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 20:47 IST

मंचरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरद पवार गट) बैठक

मंचर: सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल मी एकही वाईट शब्द बोलणार नाही. मी लढणारा कार्यकर्ता आहे. लोकशाहीत दडपशाहीने काम करू नये. लवकरच शरद पवार यांची तालुक्यात न भूतो न भविष्य अशी सभा होणार आहे. आमदार अथवा खासदार व्हायचंय, निवडणूक लढवायची आहे असे मी कधीही म्हटले नाही. मात्र शरद पवार देतील तो आदेश व बांधतील ते तोरण अशा शब्दात अप्रत्यक्षपणे आंबेगावमधून निवडणूक लढवण्याचे माजी सभापती, भीमाशंकर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांनी संकेत दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरद पवार गट) आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाची बैठक मंचर येथे पार पडली. त्यावेळी निकम बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, युवक अध्यक्ष स्वप्निल गायकवाड, माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले ,उद्योजक किसन उंडे, दादाभाऊ थोरात,प्रमोद गोतारने, दामू अण्णा घोडे, गुलाब धुमाळ,धोंडीभाऊ भोर ,नानासाहेब फुलसुंदर ,कारभारी भोर ,सनी थिटे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

देवदत्त निकम म्हणाले, मंचर बाजार समितीच्या निवडणुकीत मला उमेदवारी नाकारली. एक व्यक्ती एक पद हा नियम फक्त निकम यांच्या पुरताच का? नेत्यांनी लाथडले तरी जनतेच्या दारात जायचे ठरवले व जनतेने मला विजयी केले. आयुष्यभर शेतकऱ्यांचे ऋण फेडू शकणार नाही. कार्यकर्त्यांनी माझे स्टेटस ठेवले की त्यांना चारजण फोन करून स्टेटस का ठेवले असा जाब विचारतात. बदली करू, कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. ही दडपशाही आहे. भीमाशंकर कारखाना व बाजार समितीवर मला संधी दिली त्याबद्दल मी आदर करतो.मात्र बाजार समितीत एकटा असलो तरी सतरा जणांना मी घाम फोडतोय.

जगन्नाथ शेवाळे म्हणाले, राज्याचा विकासाचा खरा चेहरा शरद पवार आहेत. देशात ,राज्यात तसेच या तालुक्याचा कारभारच नाही तर कारभारी चुकला आहे. आगामी काळात येथील वाण बदलायचा असून भाकरीही फिरवायची आहे. आपले मत विभाजन झाले नसून मते वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.

ऊस दराबाबत जाब विचारणारवळसे पाटील यांच्या बद्दल एकही वाईट शब्द बोलणार नाही. त्यांचा फोटो आजही हृदयात आहे. मात्र यापूर्वी भीमाशंकर कारखान्याच्या बैठकीत संचालक म्हणून त्यांच्या शेजारी बसत होतो. जेव्हापासून शरद पवार यांच्या सोबत गेलो. तेव्हा मला शेजारी खुर्ची ठेवली नाही. मी समोर बसलो होतो. बाजार समितीच्या एकाही समितीत मला घेतले नाही. मी लढणारा कार्यकर्ता असून झुकणार नाही. संस्था तुमच्या मालकीची नसून जनतेची आहे. कारखान्याच्या वार्षिक सभेत त्यांच्या मांडीला मांडी न लावता समोर बसून ऊसाला भाव का मिळत नाही असा जाब विचारणार असल्याचेही देवदत्त निकम म्हणाले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस