शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

बालगंधर्व रंगमंदिर पाडून ‘पुलं’ना अभिवादन करणार का? महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 03:56 IST

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीला या वर्षी ८ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी पुलंच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली झाली. ‘बालगंधर्व रंगमंदिर पाडून जनशताब्दी वर्षात पुलंना अभिवादन करणार का?’ अशा शब्दांत महाराष्ट्र साहित्य परिषदेने बालगंधर्व रंगमंदिर पाडून पुनर्विकास करण्याच्या पुणे महापालिकेच्या निर्णयाला विरोध केला आहे.

पुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीला या वर्षी ८ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी पुलंच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली झाली. ‘बालगंधर्व रंगमंदिर पाडून जनशताब्दी वर्षात पुलंना अभिवादन करणार का?’ अशा शब्दांत महाराष्ट्र साहित्य परिषदेने बालगंधर्व रंगमंदिर पाडून पुनर्विकास करण्याच्या पुणे महापालिकेच्या निर्णयाला विरोध केला आहे.‘बालगंधर्व रंगमंदिर ही केवळ दगडविटांची निर्जीव वास्तू नाही. या वास्तूशी कलावंत आणि रसिकांचे भावनिक नाते आहे. अनेक दिग्गज कलावंत आणि सारस्वतांच्या कलाविष्काराने आणि पदस्पर्शाने पावन झालेली ही वास्तू आहे. साहित्यिक आणि कलावंतांना ऊर्जा देणारे बालगंधर्व रंगमंदिर हे सर्जनकेंद्र आहे. या वास्तूची निगा व देखभाल राखण्यात पूर्णत: अपयशी ठरलेली पुणे महापालिका ही वास्तू पाडून पुनर्विकासाची योजना आखत आहे. ही बाब चीड आणणारी आहे. पुणेकर रसिकांच्या भावना लक्षात घेऊन ही वास्तू जपण्यासाठी प्रयत्न करावेत. नाट्यसंकुल दुसºया जागेत उभे करावे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा निर्णय घेताना साहित्य आणि कलाक्षेत्रातील लोकांशी बोलून, त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात, असे संबंधितांना वाटत नाही यातच त्यांचा कोडगेपणा दिसून येतो,’ अशी संतप्त प्रतिक्रिया मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली.‘पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, याचा विसर महापालिकेला पडला आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे सांस्कृतिक वैभव आहे,’ असेही ते म्हणाले.जन्मशताब्दी वर्षात तरी गदिमांचे स्मारक करामहाराष्ट्रवाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाबाबत पुणे महापालिका कमालीची उदासीन आहे. ग. दि. माडगूळकर यांची जन्मशताब्दी आली, तरी पुण्यात त्यांचे स्मारक होऊ शकले नाही. या वर्षात तरी ते करून दाखवा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.कट सुज्ञ नागरिकच उधळून लावतील : सुरेखा पुणेकरहजारो कलाकारांचे मंदिर व शहराची ओळख असलेली बालगंधर्व रंगमंदिर ही ऐतिहासिक वास्तू पाडण्याचा कट सुज्ञ पुणेकरच उधळून लावतील, असे लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी सांगितले. शिवसेना शिवाजीनगर मतदारसंघाच्या वतीने बालगंधर्व येथे कलाकार-नागरिक यांची मते जाणून घेण्यासाठी स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती.कलाकार आणि पुणेकरांच्या भावनांचा विचार न करता भाजपाने या वास्तूचे व्यावसायिक सेंटर उभारण्यासाठी हा घाट घातला आहे. ही वास्तू कदापि पाडू देणार नाही, असे क्षेत्रप्रमुख उमेश वाघ म्हणाले. विभागप्रमुख राहुल शिरोळे यांनी केलेल्या या आंदोलनात सुनील महाजन, अभिनेता पवनकुमार, निर्माते बाबा पठाण, मोहन कुलकर्णी, वरुण कांबळे, गायक जितेंद्र भुरूक, रेश्मी मुखर्जी यांच्यासह अनेकांनी बालगंधर्व पाडण्यास विरोध दर्शविला. सुरेखा पुणेकरांसह उपविभागप्रमुख हेमंत डाबी, मंगेश खेडेकर, सुयोग भावे, प्रवीण डोंगरे, केदार सिद्धेश्वर यांनी जनजागृती पत्रकांचे वाटप करून नागरिकांची स्वाक्षरी घेतली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र