शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तळ्यातील पाणी संपल्याने वन्यप्राण्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:27 IST

चासकमान : खेड तालुक्यातील चास परिसरातील मिरजेवाडी आणि आंबेगाव तालुक्यातील भावडी-कुदळेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असून, याच जंगलात वन्यप्राण्यांना ...

चासकमान : खेड तालुक्यातील चास परिसरातील मिरजेवाडी आणि आंबेगाव तालुक्यातील भावडी-कुदळेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असून, याच जंगलात वन्यप्राण्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून काही दिवसांपूर्वी तळे खोदण्यात आले आहे. याच तळ्यात पाणी पिण्यासाठी मोरांसह वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात येत असतात. परंतु, दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने तळ्यातील पाणी संपल्याने वन्यप्राण्यांना इतरत्र पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

एकीकडे, शासन १३ कोटी वृक्षलागवडीसाठी संकल्प करीत आहे. तसेच, वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी कृत्रिम पाणवठे तयार करून विविध उपाययोजना राबवून जनजागृती करीत आहे. मात्र, अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांचे पाणवठे आटले आहेत. चासकमान परिसरातील मिरजेवाडी, भावडी परिसरात कुदळेवाडीच्या जंगलात अज्ञात व्यक्तीकडून बेकायदेशीर वृक्षतोड सुरू आहे.मात्र, मिरजेवाडी, कुदळेवाडीच्या जंगलात वृक्षांची मोठ्या प्रमाणात सर्रास अज्ञात व्यक्तीकडून कुºहाडीचे घाव घालून कत्तल केली जात आहे. तर, अनेक झाडे निम्म्याहून अधिक कापून अर्धी, जीर्ण करून ठेवली आहेत.पूर्वी जंगलात राहाणारा बिबट्या आता चासकमान परिसरातील शेतात वरचे वर दिसू लागला आहे. कोणत्याही प्रतिकूल वातावरणाशी जूळवून घेण्यात तरबेज असलेल्या बिबट्याचा जन्म आणि पुढील वावरही उसाच्या फडात असलेली बिबट्याची पिढी आता जंगल विसरते की काय? केवळ जंगली भागात असलेले बिबटे आता अन्यत्रही दिसू लागले आहेत. त्यांच्यापासून सुरक्षिततेसाठी आता नव्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.तसेच मिरजेवाडी, कुदळेवाडी जंगल परिसरात बिबट्याचा वावर असल्याने स्वतंत्र पिजरा लावून संरक्षण सोयीसुविधा देण्याची गरज आहे. कित्येकदा बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा येईपर्यंत वेळ घालवण्याऐवजी स्थानिक वन अधिकाऱ्यांनी स्वत: त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पिजरा लावल्यानंतर त्यात बिबट्या सहज अडकेल आणि आपली जबाबदारी संपेल, अशी वन अधिकाऱ्यांना आशा असली, तरी परिस्थिती तशी नाही, हेही लक्षात ठेवले पाहिजे.बिबट्याला पकडल्यानंतर निसर्गात मुक्त करावे लागत असते. ही समस्या सोडविण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

टॅग्स :PuneपुणेAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार