Video : पुण्यात पुन्हा गव्याचं दर्शन; प्रशासनासमोर गव्याच्या सुखरुप सुटकेचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 11:21 AM2020-12-22T11:21:40+5:302020-12-22T13:55:04+5:30

बावधन येथील एच सी एम आर एल पाषाण तलावाजवळ असलेल्या भिंतीजवळ आढळला गवा

wild animal gava entered in punes bavdhan rescue operation underway | Video : पुण्यात पुन्हा गव्याचं दर्शन; प्रशासनासमोर गव्याच्या सुखरुप सुटकेचं आव्हान

Video : पुण्यात पुन्हा गव्याचं दर्शन; प्रशासनासमोर गव्याच्या सुखरुप सुटकेचं आव्हान

googlenewsNext

पुणे: बावधन येथील एच सी एम आर एल पाषाण तलावाजवळ असलेल्या भिंतीजवळ गवा आढळून आला आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणात असलेली वाहने व एचटीएमएलची भिंत या दोन्हीमध्ये गवा असल्याने या दाव्याला हाताळणे  कठीण जात आहे. गवा महामार्गावर येऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे.

बावधन येथील हायवेलगत असलेल्या हॉटेल शिवप्रसाद समोरील रस्त्यापलीकडे जंगलात हा गवा आलेला आहे. त्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रशासन, वन विभागाचे कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. रेस्क्यू करण्याचे काम सुरू असून नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

१३ दिवसांपूर्वीच ९ डिसेंबरला कोथरूड परिसरात आलेल्या गव्याला रेस्क्यू करताना उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पुण्यात पुन्हा एकदा गवा आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कोथरूडमध्ये आलेल्या गव्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियातून हळहळ व्यक्त केली गेली होती. त्यानंतर आज पुन्हा गवा आल्यानंतर प्रशासनाची आणि रेस्क्यू टीमची मोठी त्रेधातिरपीट उडाली आहे. या गव्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

परिसराची संपूर्णपणे पाहणी करून गव्याला एचईएमआरएल च्या कंपाउंडमध्ये असलेल्या जंगलामध्ये परत पाठवण्यासाठी आखणी केली जात आहे. महामार्ग लगत संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल मागवण्यात आले आहे. पोलीस दलाच्या अतिरिक्त तुकड्या दाखल झाल्या असून महामार्गालगत तात्पुरते संरक्षण तयार करून त्याला पुन्हा त्याच्या आदिवासा मध्ये सोडण्यासाठी चे प्रयत्न करण्यात येणार आहेत.

पाच तास उलटून गेल्यानंतर हे अद्याप गव्याला पकडण्यामध्ये वन विभागाला अपयश..  

पाच तास उलटून गेल्यानंतर हे अद्याप गव्याला पकडण्या मध्ये वन विभागाला यश आले नाही.रेस्क्यू टीमला देखील गावाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मध्ये सोडण्यासाठी मार्ग सापडत नसल्याने अद्याप गवा महामार्ग व एच ई एम आर एल मधील जागेतच वावरताना दिसत आहे.स्थानिक ग्रामस्थांच्या मते एचईएमआरएल परिसरामधील गवे अनेकदा गाई म्हशीं बरोबर कंपाऊंडच्या बाहेर येतात. व त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये परत जातात.
अनुभवाची कमतरता असलेली टीम असल्याने गव्याला नैसर्गिक अधिवासामध्ये परत पाठवणे मध्ये यश मिळत असल्याची चर्चा सध्या होत आहे.
 स्थानिक गोपालक व म्हशी पाळणाऱ्या नागरिकांच्या मदतीने गोव्याला नैसर्गिक आदिवासात सोडण्यासाठी वाटांचा शोध घेतला जात आहे.

Read in English

Web Title: wild animal gava entered in punes bavdhan rescue operation underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.