शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

श्रीपाल सबनीसांचे तोंड दहा वर्षे बंद का?: रामदास फुटाणे यांची खरमरीत शब्दांत टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 13:26 IST

दहा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटून गेल्यावर सबनीसांना डॉ. आनंद यादव यांचा पुळका का आला? संधी साधून भाषणे ठोकण्याचा प्रकार काही जणांकडून सुरू आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ कवी आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी सबनीसांच्या विधानाचा समाचार घेतला. 

ठळक मुद्देआडकर फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांचा सत्कारस्वातंत्र्य आणि समता यांचा समन्वय साधण्याचे काम बंधुता करते : सदानंद मोरे

पुणे : दहा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटून गेल्यावर सबनीसांना डॉ. आनंद यादव यांचा पुळका का आला? एवढे दिवस सबनीसांचे तोंड का बंद राहिले? भविष्यात आपली महत्त्वाची पदे जाऊ नये, बदनामी होऊ नये यासाठी किंवा संधी साधून भाषणे ठोकण्याचा प्रकार काही जणांकडून सुरू आहे, अशा खरमरीत शब्दांत ज्येष्ठ कवी आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी सबनीसांच्या विधानाचा समाचार घेतला. आडकर फाउंडेशनतर्फे १९व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांचा सत्कार समारंभ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. डॉ. आनंद यादवांच्या अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाला, त्या वेळी महाराष्ट्राने बंधुता किंवा क्षमाशीलता दाखविली नाही, अशी टीका एका कार्यक्रमात श्रीपाल सबनीसांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर फुटाणे यांनी टिप्पणी केली. या प्रसंगी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, संमेलनाध्यक्षपदाचे उमेदवार लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारिणीचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, आडकर फाउंडेशनचे अ‍ॅड. प्रमोद आडकर उपस्थित होते. फुटाणे म्हणाले, ‘‘साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिल्यावरही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी साहित्यिकांना गावोगावी मतपत्रिका गोळा करण्यासाठी फिरावे लागत आहे. भविष्यात साहित्यातील कारकिर्दीपेक्षा ज्या उमेदवाराकडे मतपत्रिका गोळा करण्याची क्षमता आहे, तोच व्यक्ती अध्यक्षपदी निवडून येऊ शकतो.’’ सदानंद मोरे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य आणि समता यांचा समन्वय साधण्याचे काम बंधुता करते. बंधुतेशिवाय स्वातंत्र्य आणि समरसता निरर्थक ठरू शकतात. अमेरिकेने मध्यंतरी मुस्लिमबहुल राष्ट्रांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती. त्यामुळे तिथे स्वातंत्र्य समरसतेचे राष्ट्र होऊ शकते, पण बंधुताप्रिय नाही.’’उद्धव कानडे म्हणाले, ‘‘विविध जाती धर्माचे कळप तयार करुन संमेलनांचे आयोजन करण्यात येते. मात्र जात, पंथ, धर्म यांच्या पलीकडे जाऊन होणाऱ्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे हे भाग्याचे लक्षण आहे. माझ्या जडणघडणीत फुटाणे, मोरे या दिग्गज लोकांचा खूप मोठा वाटा आहे.’’ 

टॅग्स :ramdas phutaneरामदास फुटाणेShripal Sabnisश्रीपाल सबनीसPuneपुणे