शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई विषय मांडण्याची लाज का? जानू बरुआ यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 01:57 IST

आशियाई चित्रपटसंस्कृती श्रीमंत आहे, पण आपण त्याला चांगल्या पद्धतीने सादर करत नाही. आपण पाश्चात्त्य संस्कृती उधार घेतो.

पुणे : आशियाई चित्रपटसंस्कृती श्रीमंत आहे, पण आपण त्याला चांगल्या पद्धतीने सादर करत नाही. आपण पाश्चात्त्य संस्कृती उधार घेतो. आशियाई देशात खूप विषय दडले आहेत जे आपण मांडत नाही आपल्याला ते मांडण्याची लाज वाटते किंवा आपल्याला स्वत:ची संस्कृती माहिती नाही. पाश्चिमात्य दिग्दर्शक त्यांच्या कथा चित्रपटांमध्ये अभिमानाने सांगतात मग आपण का नाही? असा सवाल ज्येष्ठ दिग्दर्शक जानू बरुआ यांनी उपस्थित केला.नवव्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन जानू बरुआ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी एनएफएआयच्या सहायक संचालक कीर्ती तिवारी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे मिलिंद लेले, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे तसेच महोत्सव संचालक सतीश जकातदार आणि वीरेंद्र चित्राव उपस्थित होते. यावेळी गजेंद्र अहिरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.पुणे माझे दुसरे घर आहे. पुण्यात यायचं निमंत्रण मिळते तेव्हा ते मी चुकवत नाही, अशी भावना व्यक्त करून जानू बरुआ म्हणाले, प्रत्येक चित्रपटसृष्टीला ओळख आणि चेहरा आहे. परंतु, आशियाई चित्रपट ती ओळख प्राप्त करण्यासाठी संघर्ष करतो आहे. चित्रपटाशी संबंधित प्रत्येक घटकाने चित्रपटाला मान द्यायला शिकले पाहिजे. पाश्चात्त्य चित्रपटसृष्टीशी तुलना केली असता त्यांच्याकडे सांगण्यासारखी ‘गोष्ट’ नाही. त्या तुलनेत भारतातील विविधतेने नटलेली संस्कृती आणि भाषा यामुळे आपल्याकडे भरपूर ‘गोष्ट’ आहेत. पाश्चात्त्यांकडून उधारीवर घेतलेल्या संकल्पनांवर चित्रपट तयार करण्यापेक्षा आपल्याकडील अस्सल आणि वास्तवदर्शक गोष्टींवर चित्रपट निर्मात्यांनी काम केले पाहिजे. सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले.हा आनंदाचा नव्हे, तर दडपण आणणारा क्षण आहे. सिनेमा कसा करायचा माहिती नव्हते, पण करायचा आहे हे पक्के होते. तंत्रज्ञान आणि विषय यात जो बदल झाला त्याचा साक्षीदार ठरलो. काही चढउतार पाहिले पण रसिक मित्रमंडळी पाठीशी राहिली. चित्रपट किती यशस्वी झाला आणि नफा किती मिळवला याचा विचार कधी केला नाही. चित्रपट कसा करायचा नाही हे शिकलो. आज आॅक्सरपर्यंत चित्रपट गेला आहे. पन्नासावा चित्रपट करीत आहे तो प्रवास गमतीशीर आहे. चित्रपट कसा बनवावा, याचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.- गजेंद्र अहिरे

टॅग्स :Puneपुणे