शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोणाचे शिर्डीच्या साईबाबाला तर कोणाचे देवभावराच्या देवीला नवस; मतदारांचे असेही प्रेम... !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 18:19 IST

नेत्यांवरील प्रेमापोटी लोक काहीही करायला तयार असतात

सोमेश्वरनगर : अनेक ठिकाणी आपण राजकीय नेत्यांवरील लोकांचे प्रेम पाहिले आहे. नेत्यांवरील प्रेमापोटी लोक काहीही करायला तयार असतात. असाच एक अनुभव नुकताच आला आहे. नुकत्याच बारामती तालुक्यातील वाणेवाडी ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली. यामध्ये गाव पॅनेलच्या विरोधात उभ्या असलेल्या गितांजली दिग्विजय जगताप ह्या सरपंचपदाला उभ्या राहिल्या होत्या. त्यांच्यावरील असलेले निखळ प्रेम मतमोजणी दिवशी संपूर्ण गावाने अनुभवले. जगताप या निवडून याव्यात म्हणून कोणी शिर्डीच्या साईबाबाला नवस बोलले, कोणी शिरूरच्या देवभावराच्या देवीला नवस बोलले, कोणी मारुतीला पेढ्याचे नवस बोलले, कोणी सोमेश्वरला जेवणाची पंगत घालण्याचा नवस बोलले काही महिला मतदारांनी तर मतमोजणी दिवशी चक्क देवच पाण्यात घातले. वाणेवाडीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड नंबर ३ मळशी-दत्तवाडी व वार्ड नंबर ५ विकासनगर-रामनगर या भागातील मतदारांनी हे नवस बोलले होते. यातील दोन मतदारांचे मारुतीला बोललेला पेढ्यांचा नवस पूर्ण केला असून लवकरच सरपंच गितांजली जगताप व त्यांचे पती दिग्विजय जगताप हे जोडीने मतदारांसह राहिलेले नवस पूर्ण करणार आहेत. वाणेवाडी (ता. बारामती) येथे गावकारभाऱ्यांनी एकत्र येत उभारलेल्या पॅनेलला अपक्ष उमेदवारांनी जोरदार धक्का दिला. गावकरी पॅनेलच्या विद्या सुनिल भोसले यांचा अपक्ष उमेदवार गीतांजली दिग्विजय जगताप यांनी तब्बल ४०३ मतांनी पराभव केला. तेरापैकी नऊ सदस्यांचे बहुमत गावकरी पॅनेलच्या पदरात पडले आहे. तर मतदारांनी चार अपक्षांनाही निवडून दिले आहे.

वाणेवाडी ग्रामपंचायतीला बिनविरोध निवडणुकीची परंपरा असली तरी यावेळी त्यात यश आले नाही. गावकारभाऱ्यांच्या हनुमान ग्रामविकास पॅनेलकडून सोमेश्वर काऱखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, माजी संचालक किशोर भोसले, राष्ट्रवादी युवकचे माजी तालुकाध्यक्ष विक्रम भोसले, उद्योजक सुनिल भोसले व राजेंद्र जगताप, प्रवीण भोसले अशा मातब्बरांची ताकद होती. या पॅनेलने विद्या सुनिल भोसले यांना सरपंचपदाची उमेदवारी जाहीर केली. माजी सरपंच दिग्विजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली अपक्ष उमेदवार गितांजली जगताप यांनी कडवे आव्हान दिले. टप्प्याटप्प्याने गावकऱ्यांच्या हातून निवडणूक मतदारांच्या हातात गेली आणि सरपंचपद निसटत गेले. दुरंगी लढतीत पहिल्या प्रभागात विद्या भोसले यांनी मोठी आघाडी घेतली. मात्र उर्वरीत चारही प्रभागात गितांजली जगताप यांनी निर्णायक मते प्राप्त केली.

 

टॅग्स :Puneपुणेgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकPoliticsराजकारण