येथील वागदरवाडी येथे रवींद्र पांडुरंग खेडेकर यांचे संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले.
२६ जानेवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास रवींद्र खेडेकर अंजिराच्या फळांच्या पेट्या भरण्याचे काम करीत होते. त्याच वेळी त्यांची पुतणी आकांशा हिने घराच्या बाहेर असलेल्या लाईटच्या मीटर जवळ खूप आग लागल्याचे सांगितले.
त्यानंतर रवींद्र खेडेकर यांनी ताबडतोब घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. या वेळी वा-यामुळे संपूर्ण घराने पेट घेतला अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे रवींद्र खेडेकर यांनी सांगितले.
खेडेकर यांच्या मुलाचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्नात मिळालेले सर्व फर्निचर, टीव्ही,कपाट, दिवाण, फ्रिज तसेच भांडी कुंडी, सर्व शासकीय कागदपत्रे, शाळेचे दाखले,सर्व कपडे जळून खाक झाले. या कुटुंबातील सदस्यांकडे फक्त आंगावरील कपडेच राहिले आहेत. या कुटुंबावर फार मोठे संकट उभे राहिले आहे याबाबत महसूल विभागानेही तलाठी यांचे मार्फत पंचनामा केला आहे
समाजातील दानशूर व्यक्ती ,संस्था यांनी हातभार लावावा लागणार आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडेपाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन खासदार सुप्रिया सुळे व पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांना माहिती देऊन महावितरण कंपनीचे अधिकारी यांना कल्पना देऊन, फोन करून तातडीने मदत करण्यासाठी आवाहन केले तसेच या कुटुंबाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तसेच शासनाच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे माणिकराव झेंडे पाटील यांनी सांगितले.
यावेळी वाघापूर येथील महावितरण कंपनीचे शाखा अभियंता विशाल सोनवणे यांनी घटनास्थळी पहाणी केली असून तातडीने अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे सांगितले. या आगीत रवींद्र खेडेकर यांचे चुलते यांचे शिवाजी बळीबा खेडेकर यांचेही घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. ही आग विझविण्यासाठी स्थानिक नागरिक, जेजुरी व सासवड नगरपालिकेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न केले तोपर्येंत खुप नुकसान झाले.
गु-होळी येथे जळालेल्या घराची पहाणी करताना राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडे व इतर