शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

महायुतीत कोणाला जागा सुटणार?

By admin | Updated: August 21, 2014 00:38 IST

एका बाजूला उच्चभ्रू सोसायटी, तर दुसरीकडे कासेवाडी, मंगळवार पेठ, ताडीवाला रोड असा झोपडपट्टीने व्यापलेल्या या विधानसभा मतदारसंघ नेहमीच काँग्रेसच्या बाजूने कौल देत आला आह़े

पुणो : एका बाजूला  उच्चभ्रू सोसायटी, तर दुसरीकडे कासेवाडी, मंगळवार पेठ, ताडीवाला रोड असा झोपडपट्टीने व्यापलेल्या या विधानसभा मतदारसंघ नेहमीच काँग्रेसच्या बाजूने कौल देत आला आह़े या उलट शिवसेना- भारतीय जनता पार्टी युतीला अजूनही या मतदारसंघात घट्ट पाय रोवता आले नाही़ शिवसेनेच्या वाटय़ाला आलेल्या या जागेसाठी त्यांना नेहमीच उमेदवार आयात करावा लागला आह़े त्या पाश्र्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाने कॅन्टोन्मेंटवर दावा केल्याने काँग्रेसला टक्कर देण्यासाठी महायुतीत ही जागा कोणाला सुटणार, याविषयी सध्या प्रमुख चर्चा या मतदारसंघात सुरू आह़े 
कॅन्टोन्मेंट मतदारसंघाने 1999 चा अपवाद वगळता गेल्या 2क् वर्षात कायमच काँग्रेस उमेदवाराला निवडून दिले आह़े पुनर्रचनेनंतर यातील हडपसरचा भाग वगळला गेल्यानंतरही 2क्क्9 मध्ये रमेश बागवे यांनी शिवसेनेचे सदानंद शेट्टी यांचा 37 हजार मतांनी पराभव केला होता़ बागवे यांना 61 हजार 854 मते, तर सदानंद शेट्टी यांना 26 हजार 931 आणि रिपब्लिकन पक्षाचे रोहिदास गायकवाड यांना 5 हजार 5 मते मिळाली होती़ या निवडणुकीनंतर काही महिन्यांनंतर शेट्टी यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आह़े 
लोकसभा निवडणुकीत अनिल शिरोळे यांना या मतदारसंघात 63 हजार 79क् मते मिळाली होती, तर विश्वजित कदम यांना 59 हजार 859 मते मिळाली होती़ मनसेचे दीपक पायगुडे यांना 12 हजार 712 मते मिळाली होती़ शिरोळे यांना या मतदारसंघात आघाडी मिळाली असली, तरी ती अन्य विधानसभा मतदारसंघापेक्षा कमी आह़े त्यामुळे मोदी लाटेचा प्रभाव विधानसभेर्पयत ओसरला, तर आपल्याला चांगली संधी मिळू शकते, अशी काँग्रेसमधील इच्छुकांचे गणित आह़े 
ही जागा शिवसेनेकडे असली तरी त्यांना या भागात अजूनही संघटना मजबूत करणो शक्य झाले नाही़ गेल्या वेळी सदानंद शेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली होती़ यंदाही त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे ही जागा महायुतीत रिपब्लिकन पक्षासाठी सोडण्यात येण्याची शक्यता आह़े आरपीआयकडून परशुराम वाडेकर हे प्रमुख इच्छुक आहेत़ त्यांचीच निवड होणार असल्याची सध्या चर्चा आह़े 
मनसेचे या मतदारसंघात 5 नगरसेवक आहेत़ प्रभाग 4क् मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ही जागा मनसेकडून खेचून घेतली आह़े मनसेकडून अजय तायडे, अतुल जाधव, अविनाश साळवे हे प्रमुख इच्छुक आहेत़ तिहेरी लढतीत काँग्रेसला सर्वाधिक संधी असल्याची सध्या चर्चा आह़े  (प्रतिनिधी)
 
प्रभागातील 13 नगरसेवक आघाडीचे 
4या मतदारसंघात महापालिकेचे 1क् प्रभागांतील 2क् नगरसेवकांपैकी 13 नगरसेवक आघाडीचे आहेत़ याशिवाय पुणो कॅटोंन्मेंट बोर्डातही काँग्रेसचे बहुमत आह़े 
4विद्यमान आमदार बागवे यांच्यासह बाळासाहेब बोराडे, मुकेश धिवार, भीमराव पाटोळे, मदारी अक्रम अली, सय्यद फारुक यासीन, जलसा भगवान वैराट हे इच्छुक आहेत़ त्यात बागवेंची दावेदारी मजबूत मानली जात़े मात्र, बागवे यांना मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकत्र्याचा विरोध आह़े