शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

कोण म्हणतंय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही..; बारामतीत सानुग्रह अनुदानाचा प्रश्न चिघळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 18:32 IST

कोविड-१९ या महामारीच्या काळात बारामती नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता काम केले.

ठळक मुद्देदिवाळीच्या पहिल्याच कर्मचाऱ्यांचा शिमगा; ठिय्या देत कामबंद आंदोलन केले सुरू उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले निवेदन

बारामती : बारामती नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी सानुग्रह अनुदान दिले जाते. यंदा मात्र, हा प्रश्न चिघळला आहे. सानुग्रह अनुदान न मिळाल्याने अधिकारी,कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (दि. १२ ) नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. ऐन दिवाळीत आंदोलन सुरु झाल्याने शहरातील स्वच्छतेसह विविध कामांवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे.

दरवर्षी सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांना देण्यासाठी तत्परता दाखविली जाते. मात्र, मंगळवारी(दि  १०) अचानक  नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पदाधिकारी यांनी सानुग्रह अनुदानाबाबत विचार करून मार्ग काढु, असे आश्वासन दिले. आजपर्यंत याबाबत निर्णय न झाल्याने गुरुवारी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला.तसेच कामगार संघटनेचा विजय असो, कोण म्हणतंय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी घोषणाबाजी केली.

गुरुवारी ( दि. १२ )बारामती नगर परिषदेसमोर कर्मचारी एकत्रित आले. कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी किरणराज यादव यांच्याकडे सानुग्रह अनुदानाबाबत विचारणा केली.त्यावर यादव यांनी मी देखील तुमच्यातील कर्मचारी आहे. माझ्या हातात काही नाही याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नगराध्यक्षांचा आहे. त्यानंतर यावर अधिकारी व कर्मचारी यांनी पालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी केली.तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले. 

यावर्षी कोविड-१९ या महामारीच्या काळात पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता काम केले. कोविड रुग्ण असलेल्या परिसरात जाऊन निर्जंतुकीकरण करणे, बॅरागेट  बांधणे आदी कामांचा त्यामध्ये समावेश आहे. ज्या काळात कोरोना रुग्णाच्या जवळ जाण्यास कोणी धजावत नव्हते, त्यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. पूरपरिस्थितीच्या बिकट काळात काम केले. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, स्ट्रीट लाईट, अग्निशमन, या सर्व ठिकाणी कर्मचारी आघाडीवर होते,असे उपमुख्यमंत्री पवार यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.बारामतीच्या आसपासच्या ब वर्ग नगरपालिकांनी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले आहे. पण बारामती नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे, असे संतप्त कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.————————————————...गेट बंद करुन काम बंद आंदोलन सुरुसर्व कर्मचाऱ्यांनी मिळून आज बारामती नगरपालिकेचे गेट बंद करुन काम बंद आंदोलन सुरु केले आहे. गुरुवारी सानुग्रह अनुदानावर पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला नाही. तर उद्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असे कामगार प्रतिनिधी राजेंद्र सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Baramatiबारामतीnagaradhyakshaनगराध्यक्षEmployeeकर्मचारीDiwaliदिवाळी