शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हवेली पंचायत समितीची सत्ता कुणाकडे? तालुक्याचे लक्ष; जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 21:41 IST

हवेली तालुक्यातील ६ गटांचे निकाल जाहीर; चुरशीच्या लढतीत अनेक ठिकाणी अल्प मतांनी विजय...

उरुळी कांचन : हवेली तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून पंचायत समितीतील सत्तेच्या चाव्या अपक्ष सदस्यांच्या हाती गेल्या आहेत. एकूण १२ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) सर्वाधिक ६ जागा, भाजपाला ४ जागा, शिवसेना शिंदे गटाला १ जागा तर १ जागा अपक्ष उमेदवाराने पटकावली आहे. बहुमताचा आकडा ७ असताना कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने पंचायत समितीतील सत्तास्थापनेत अपक्ष सदस्य निर्णायक ठरणार की कोण याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखत ६ पैकी ४ जागा जिंकल्या आहेत. भाजपाला १ तर शिवसेना शिंदे गटाला १ जागा मिळाली आहे.

मतमोजणी शांततेत पार -हवेली पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांची मतमोजणी प्रक्रिया पुण्यातील सिंहगड कॉलेज येथे पार पडली. सकाळी १० वाजता सुरू झालेली मतमोजणी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होती. निवडणूक अधिकारी यशवंत माने, तहसीलदार तृप्ती कोलते, तहसीलदार अर्चना निकम व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडली.

गटनिहाय निकाल -गट क्रमांक ३७ – पेरणे-लोणीकंदजिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या किरण साकोरे यांनी ३,०५१ मतांनी विजय मिळवला. विजयी किरण साकोरे – १५,२३४पराभूत : प्रदीप वसंत कंद (भाजपा) – १२,१८३पंचायत समिती लोणीकंद गण (७३) मध्ये मोनिका कंद (भाजपा) ४,४८६ मतांनी विजयी ठरल्या.पेरणे गण (७४) मध्ये राणी वाळके यांनी अवघ्या २९२ मतांनी विजय मिळवला.लोणीकंद–पेरणे गट व गणात भाजपाचे तिन्ही उमेदवार विजयी ठरले.

गट क्रमांक ३८ – कोरेगाव मूळजिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा हरगुडे यांनी ९,०३४ मतांनी भाजपाच्या कविता पायगुडे यांचा पराभव केला.पंचायत समिती केसनानंद गण (७५) मध्ये भाजपाचे कुशाल सातव ४,४३७ मतांनी विजयी झाले.नायगाव गण (७६) मध्ये राष्ट्रवादीचे मनोज ऊर्फ कृषीराज चौधरी केवळ ४ मतांनी विजयी ठरले.

     या गटात जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे, पंचायत समितीत राष्ट्रवादी व भाजप प्रत्येकी एक जागा.गट क्रमांक ३९ – उरुळी कांचन-सोरतापवाडीजिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे जितेंद्र बडेकर १,६०१ मतांनी विजयी झाले.   पंचायत समिती उरुळी कांचन गण (७७) मध्ये कोमल कांबळे (राष्ट्रवादी) २,६३५ मतांनी विजयी.सोरतापवाडी गण (७८) मध्ये भाजपाचे सुदर्शन चौधरी ६८७ मतांनी विजयी.

जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे, पंचायत समितीत राष्ट्रवादी व भाजप प्रत्येकी एक जागा.गट क्रमांक ४० – थेऊर-आव्हाळवाडीजिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीच्या कोमल संदेश आव्हाळे यांनी तब्बल १४,१४६ मतांनी मोठा विजय मिळवला.पंचायत समिती थेऊर गण (७९) मध्ये युवराज काकडे (राष्ट्रवादी) ५,२१२ मतांनी विजयी.आव्हाळवाडी-थेऊर गण (८०) मध्ये सुषमा मुरकुटे (राष्ट्रवादी) ५,३०५ मतांनी विजयी.

 या गटात जिल्हा परिषद व पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे पूर्ण वर्चस्व.

गट क्रमांक ४१ – लोणी काळभोर-कदमवाक वस्ती -जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीच्या शीतल कांबळे ४,८१० मतांनी विजयी ठरल्या.पंचायत समिती गण (८१) मध्ये अमोल टेकाळे (राष्ट्रवादी) अवघ्या २२० मतांनी विजयी.वडकी गण (८२) मध्ये विद्या गायकवाड (अपक्ष) १२८ मतांनी विजयी ठरल्या.येथे पंचायत समितीत अपक्ष उमेदवार निर्णायक ठरला आहे.गट क्रमांक ४२ – खेड शिवापूरजिल्हा परिषद गटातून रुपाली कोंडे (शिवसेना शिंदे गट) ५,१०५ मतांनी विजयी झाल्या.पंचायत समिती खेड शिवापूर गण (८३) मध्ये शुभांगी खिरीड (शिंदे गट) विजयी.खानापूर गण (८४) मध्ये युवराज वांजळे (राष्ट्रवादी) १,७०७ मतांनी विजयी.

हवेली तालुक्यात जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असली तरी पंचायत समितीत स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. अपक्ष सदस्यांची भूमिका पुढील राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Haveli Panchayat Samiti Power Struggle: All Eyes on Independent Candidate

Web Summary : Haveli Panchayat Samiti elections resulted in a split verdict. Nationalist Congress Party won the most seats, but an independent holds the key to forming the government. NCP dominates Zilla Parishad.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६NCPराष्ट्रवादी काँग्रेसpanchayat samitiपंचायत समितीElectionनिवडणूक 2026