शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

जिल्हा परिषदेवर वर्चस्व कोणाचे?

By admin | Updated: February 23, 2017 02:36 IST

बहुमतासाठी आवश्यक असणारा ३८ हा आकडा एकट्याच्या बळावर राष्ट्रवादी गाठेल की सत्तेसाठी

पुणे : बहुमतासाठी आवश्यक असणारा ३८ हा आकडा एकट्याच्या बळावर राष्ट्रवादी गाठेल की सत्तेसाठी कोणाचा टेकू घ्यावा लागेल? अपक्षांच्या मदतीने बहुमत सिद्ध करेल की मित्रपक्ष काँग्रेसला सत्तेत सहभागी करून घेईल? असे असंख्य प्रश्न जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानानंतर चर्चेत येत आहेत. या प्रश्नांवरचा पडदा गुरूवारी उठणार असून, जिल्हा परिषदेवर वर्चस्व कोणाचे याचा फैसला होणार आहे. बुधवारी जिल्हा परिषदेच्या ७५ जागांसाठी व पंचायत समितीच्या १५0 जागांसाठी निवडणूक झाली. यात ग्रामीण मतदारांनी १ हजार ४ उमेदवारांचे भवितव्य ६९.८७ टक्के मतदान करून मतपेटीत बंद केले होते. २७ लाख ९२ हजार २२४ मतदारांपैैकी १९ लाख५0 हजार ९५२ मतदारांनी कुणाला कौल दिला? याचा फैैसला आज लागेल. यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. सध्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ७५ पैैकी ४१ सदस्य असून एकहाती सत्ता आहे. राज्यात मिळत असलेल्या यश पाहता या निवडणुकीत जिल्हा परिषदेतही सत्ता मिळविण्याचे स्वप्न भाजपाने पाहिले आहे. मात्र रिंगणात उभे केलेले उमेदवार पाहता भाजपा आता तीन सदस्य असलेला आकडा वाढविण्यात किती यशस्वी होईल हा प्रश्न आहे. असे असले तरी शिवसेनेची घौैडदौड पाहता सध्या १३ सदस्य असलेली शिवसेना मात्र आपले दुसरे स्थान कायम ठेवत हा आकडा वाढवेल अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. ११ सदस्य असलेली काँग्रेसही काही जागा वाढवेल असे बोलले जात आहे. या शक्यता खऱ्या ठरल्या तर सत्ताधारी राष्ट्रवादीला जिल्ह्यात किमान ५ ते १0 जागांचा फटका बसून त्यांची सदस्य संख्या ३0 ते ३५ इतकी होवू शकते. असे झाले तर राष्ट्रवादी हा एक नंबरचा राहिल, मात्र सत्तेसाठीचा ३८ हा आकडा कसा गाठेल? यावर तर्कवितर्क सुरू आहेत. सध्या राष्ट्रवादीची तिकीट न मिळाल्याने बंडखोरीकरून रिंगणात असलेल्या अपक्षांचा विचार केला तर किमान तीन जागा या निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे तीन सदस्य जरी राष्ट्रवादी मिळवू शकला, तरी त्यांना सत्तेसाठी मित्रपक्ष काँग्रेसशी वाटाघाटी कराव्या लागतील, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. निकालाच्या प्रतीक्षेतील उमेदवारांचे देव पाण्यात बारामतीमध्ये राष्ट्रवादीला भारतीय जनता पक्षाने कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे नेहमीच यशाबाबत आत्मविश्वास असणारे राष्ट्रवादीचे उमेदवार यंदाच्या निवडणुकीत तणावात असल्याचे चित्र आहे. निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे निकालाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांनी पाण्यात ठेवले आहेत. विशेषत राष्ट्रवादीला कडवे आव्हान निर्माण करण्यात सुपे-मेडद, सांगवी-डोर्लेवाडी, माळेगाव-पणदरे गटाच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यांच्या निकालाकडे लागले लक्ष विशेष म्हणजे या निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या मातोश्री रत्नप्रभा पाटील, अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार, दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील, शरद सोनावणे यांचे बंधू शशिकांत सोनावणे, अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार यांना रिंगणात उतरवले होते. त्यामुळे निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आजी, माजी सदस्यांचे भवितव्य ठरणारमाजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, पांडूरंग पवार, अरूग गिरे, माजी सभापती शरद बुट्टे पाटील, अरूण चांभारे, दिनकर धरपाळे, रणजित शिवतरे, वैशाली पाटील यांच्यासह राणी शेळके, विश्वास देवकाते, ऋतुजा पाटील, राहूल पाचर्णे व सलग चौथ्यांदा रिंगणात असलेल्या आशा बुचके या पाच विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांचे भवितव्य आज उघडणार आहे. जयश्री पलांडे, राजेंद्र गुंजाळ, तुषार थोरात, राजश्री बोरकर, कैलासबुवा काळे, रामदास दाभाडे, जयश्री पोकळे, प्रज्ञा भोर, सुदाम इंगळे, वीरधवल जगदाळे, सुजता गावडे, भाऊ देवाडे, प्रमोद काकडे व वैैशाली हारपळे या माजी सदस्यांचाही जिल्हा परिषदेत फैसला होणार आहे. सध्याचे पक्षीय बलाबलजिल्हा परिषद व १0 पंचायत समित्यांत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. वेल्हे काँग्रेस, जुन्नर शिवसेना तर मावळ पंचायत समिती भाजपाकडे आहे.जिल्हा परिषदेच्या ७५ जागांमध्ये सध्या राष्ट्रवादीकडे ४१, शिवसेनेकडे १३, काँग्रेसकडे ११, भघजपकडे ३, नागरीहित आघाडीकडे ५, मनसे १ व १ अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. आज लागणाऱ्या निकालानंतर जिल्हा परिषदेत कोणाची सत्ता येणार, कोणती पंचायत समिती कोणाकडे जाणार याबाबत ग्रामीण मतदारांना उत्सुकता लागली आहे. ११ तालुक्यांत वाढला मतदानाचा टक्काजिल्हा परिषदेच्या ७५ जागांसाठी ३६५ तर पंचायत समितीच्या  १५0 जागांसाठी ६३९ अशा  २२५ जागांसाठी मंगळवारी ६९.८७ टक्के मतदान झाले. २0१२ च्या निवडणुकीत  ६५.६0 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत ते ४.२७ टक्क्यांनी वाढले असून हा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पढणार अशीही चर्चा आज दिवसभर सुरू होती. मुळशी व दौैंड हे दोन तालुके वगळता उर्वरीत ११ तालुक्यांत या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे.यात शिरूर तालुक्यात सर्वाधिक ८.९८ टक्के, त्यानंतर मावळमध्ये ७.४२, हवेलीत ६.८३, आंबेगाव ५.८७, खेड ५.५६, बारामती ५.0९, इंदापूर४.२७, जुन्नर ३.९३, पुरंदर२.६९ तर वेल्हे तालुक्यात १.४३ टक्के मतदानात वाढ झाली.