शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत वाढलेल्या साडेतीन टक्के मतांचा फायदा कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 13:04 IST

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्टÑवादी कॉँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना भारतीय जनता पक्षाच्या कांचन कुल यांनी आव्हान दिले आहे.

ठळक मुद्दे६१.५४ टक्के मतदान : बारामतीत सर्वाधिक तर खडकवासल्यात सर्वात कमी टक्केवारी 

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात यंदाच्या वेळी २०१४ च्या तुलनेत साडेतीन टक्यांनी मतांचा टक्का वाढला आहे. या वाढलेल्या मतांचा फायदा कोणाला होणार? हाच प्रश्न आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात वाढलेली टक्केवारी आणि त्या तुलनेत खडकवासल्यात घटलेला टक्का यामुळे निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना भारतीय जनता पक्षाच्या कांचन कुल यांनी आव्हान दिले आहे. गेल्या वर्षी भाजपा पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांची सुळे यांच्याशी लढत झाली होती. सुळे यांचा ६९ हजार मतांनी विजय झाला होता. मात्र, जानकर यांनी खडकवासल्यातून २८,१२७, दौंडमधून २५,५४८ आणि पुरंदरमधून ५,६६६ मतांची आघाडी घेतली होती. सुळे यांना बारामतीतून ९०,६२८,, इंदापूरमधून २१,६९३ आणि भोरमधून १६,८८५ मतांची आघाडी मिळाली होती. जानकर यांनी कमळ हे चिन्ह घेतले असते तर त्यांचे मताधिक्य आणखी वाढले असते अशी चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत खडकवासला आणि बारामतीतील मतदान महत्वाचे ठरणार आहे. खडकवासल्यातील मतदानाची टक्केवारी घटलेली दिसत असली तरी मतदारसंख्या वाढली आहे. गेल्या वेळी १,९६,७२६ इतके मतदान झाले होते. यंदा ते २,५१,६०६ झाले आहे. याचा अर्थ ५४,८५० मते येथून वाढली आहेत. संपूर्ण शहरी भाग असल्याने आणि भाजपाला मानणारा मतदार असला तरी राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि सुप्रिया सुळे यांनी या भागावर लक्ष केंद्रीत केले होते. मतदानामध्येही त्याचे प्रत्यंतर उमटलेले दिसले. बारामती मतदारसंघात गेल्या वेळी २ लाख ९ हजार ९३७ मतदारांनी मतदान केले होते. यावेळी त्यामध्ये २८, ३४६ मतांची वाढ होऊन २,३८, २८३ इतके मतदान झाले आहे. यामध्ये जिरायती भागातील मतदानाचे प्रमाणही लक्षणीय आहे. निवडणुकीच्या काळात तापलेला येथील पाण्याचा प्रश्न मतदानात काय परिणाम करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दौंड हा कांचन कुल यांचा घरचा मतदारसंघ आहे. याठिकाणी गेल्या वेळी १, ५०, ७८१ मतदान झाले होते. गेल्या वेळीपेक्षा ३८, ४३५ म्हणजे १,८९,२१६ इतके मतदान झाले आहे. गेल्या वेळी येथून महादेव जानकर यांना २५,५४८ मतांची आघाडी मिळाली होती. यंदाच्या वेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस सावध पावित्र्यात होती. याशिवाय रासपला मानणारा समाजघटकही फारसा त्वेषाने उतरला नव्हता. त्यामुळे येथील वाढलेला टक्का कोणाला आघाडी देतोय हे पाहणे महत्वाचे आहे. 

टॅग्स :Baramatiबारामतीbaramati-pcबारामतीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणSupriya Suleसुप्रिया सुळे