शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शीळवादनाचा अनोखा विक्रम कोची येथे घडणार; पुण्यातील ४ कलाकारांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 12:11 IST

विक्रम म्हटला की आपल्याला कौतुकामिश्रित आश्चर्यही वाटते, असाच एक अनोखा विक्रम रविवारी (दि. २५) कोची येथे घडणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन ‘इंडियन व्हिसलर्स असोसिएशन’ या संस्थेने केले आहे.

ठळक मुद्देकोची येथील म्युनसिपल टाऊनशिप हॉलमध्ये दुपारी २ ते ५ या वेळेत सादर होणार कार्यक्रममूळ पुण्याच्या असलेल्या ॠग्वेद देशपांडे या तरुणाने केली संस्थेची स्थापना

पुणे : आपण दैनंदिन आयुष्यात खूप व्यस्त असतो. रोजची धावपळ, कामाचा व्याप आणि ताणतणाव सारेच अपरिहार्य असते. पेपरवाचन किंवा वृत्तवाहिन्यांवरील बातम्या पाहात असताना अचानक आपली नजर एका बातमीवर स्थिरावते आणि आपले कुतूहल जागृत होते. मग तो सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी किंवा विराट कोहलीचा विक्रम असो. विक्रम म्हटला की आपल्याला कौतुकामिश्रित आश्चर्यही वाटते, असाच एक अनोखा विक्रम रविवारी (दि. २५) कोची येथे घडणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन ‘इंडियन व्हिसलर्स असोसिएशन’ या संस्थेने केले आहे. हा कार्यक्रम उद्या (रविवारी) कोची येथील म्युनसिपल टाऊनशिप हॉलमध्ये दुपारी २ ते ५ या वेळेत सादर होणार आहे. या अनोख्या विक्रमामध्ये सहभागी होणारे मोहन (आप्पा) कुलकर्णी या विक्रमाविषयी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, या संस्थेची स्थापना मूळ पुण्याच्या पण सध्या मुंबईत कार्यरत असलेल्या ॠग्वेद देशपांडे या तरुणाने केली आहे. विक्रमाची तयारी करणे एक आव्हानच होते. आपले सहकारी त्यांनी एकत्र केले. ही गाणी उत्तम पद्धतीने सादर केली जावीत यासाठी शीळवादकांची नोंदणी करताना प्रत्येकाची चाचणी घेऊन कलाकारांची निवड करण्यात आली. कडक अटी आणि कठोर नियमावली तयार करण्यात आली. प्रत्येकाला ‘सारे जहाँसे अच्छा’ आणि  ‘हम होंगे कामयाब’ या गाण्यांचे ‘कराओके ट्रँक्स’ बनवून देण्यात आले. बारीकसारीक तपशीलवार माहिती देण्यात आली. सध्या देशविदेशातून कोचीमध्ये आलेल्या शीळवादक कलाकारांचा सराव जोरात चालू आहे. दोन्ही गीते ताकदीने आणि पूर्ण तयारीनिशी सादर करण्यासाठी सर्व जण उत्सुक आहेत. या विक्रमामध्ये माझ्यासह किरण गांधी, यतीन जोशी, तेजस भावे सहभागी झाले आहेत. ’सारे जहाँ से अच्छा’ आणि  ‘हम होंगे कामयाब’ ही गीते एका अनोख्या वाद्यावर म्हणजे शिळेवर तब्बल दीडशे कलाकार सादर करणार आहेत. केवळ सूर आणि आघात यातून यापूर्वी पन्न्नास शीळवादक कलाकारांचा विक्रम दीडशे कलाकार मोडून काढणार आहेत. यामध्ये पुण्यातील चार शीळवादकांचा समावेश आहे.  इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड्स, आशिया बुक आॅफ रेकॉर्ड्स, लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड्स आणि बेस्ट आॅफ इंडिया या रेकॉर्डसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

टॅग्स :Puneपुणे