शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना जीएसटीचे सहायक आयुक्त जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 16:20 IST

३० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़ 

पुणे : नियमाप्रमाणे व्हॅट भरला असतानाही तक्रारदारांच्या असेसमेंट ऑर्डर विरुद्ध अपिलामध्ये न जाण्यासाठी  जीएसटी कार्यालयातील सहायक आयुक्त प्रसाद पुरुषोत्तम पाटील (वय ४८, रा़ प्रसादनगर, वडगाव शेरी ) यांना ३० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़ याबाबतची माहिती अशी, तक्रारदार हे काँट्रॅक्टर आहेत. त्यांनी २०१३ मध्ये वानवडी येथे महापालिकेचे एक बांधकामाचे काम घेतले होते. त्यावेळी सिव्हिल वर्क कामावर ५ टक्के व्हॅट होता. त्याप्रमाणे हा कर तक्रारदारांनी भरलेला होता. पंरतु, सहायक आयुक्त प्रसाद पाटील यांनी तुम्ही भरलेला टॅक्स कमी भरला आहे़ तो ८ टक्के प्रमाणे भरायचा आहे. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी असेसमेंटची मागणी केली़ त्यावेळी पाटील यांनी तुम्हाला जरी अपिल करायचे असेल तर त्यासाठी अगोदर उरलेला व्हॅट व दंड असे १७ लाख रुपये भरावे लागतील, असे सांगितले़ जर यातून तुम्हाला मार्ग काढायचा असेल तर ४५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी लाचेची मागणी केली़ तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २० मार्च रोजी तक्रार केली़ त्यानुसार त्याची पडताळणी करण्यात आली़ तेव्हा तडजोड म्हणून त्यांनी ३० हजार रुपये घेण्याचे मान्य केले़ त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी येरवडा येथील जी़ एस़ टी कार्यालयात सापळा रचला़ तक्रारदार यांच्याकडून तेथील कँटीनमध्ये ३० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले़ पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, एस़ एस़ घार्गे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली़ कारवाईनंतर पोलीस पथकाने पाटील यांच्या वडगाव शेरी येथील घरामध्ये सर्च सुरु केला आहे़