शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आज हो या कल हो...समानता का राज हो : तृतीयपंथियांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 13:37 IST

संभाजी उद्यानासमोर करण्यात आलेल्या या निदर्शनाप्रसंगी सरकारने नुकतेच तृतीयपंथीय संरक्षण विधेयकाचे दहन करण्यात आले.

ठळक मुद्देआम्ही जगायचे कसे ? : सरकारच्या नव्या तृतीयपंथीय विषयक विधेयकाचा केला विरोध सरकारने ट्रान्सजेन्डरसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात

पुणे : सरकारने तृतीयपंथी संरक्षण विषयक जे नवीन विधेयक आणले आहे त्यात अनेक जाचक अटी आहेत. काय करु नये याविषयी सांगताना त्यांनी त्यावर काय करता येईल हे मात्र सांगितले नाही. समाजापासून वाळीत टाकल्या गेलेल्या तृतीयपंथीयांच्या उदरनिवार्हाच्या मार्गावर आणि जगण्याच्या मुख्य आधारावर बंधने आल्यास त्याने जगायचे कसे? असा प्रश्न शहरातील तृतीयपंथीयांनी उपस्थित केला. तसेच आज हो या कल हो समानता का राज हो,,,  समानता करा.. नको भेदभाव तृतीयपंथीयांचा.., अशा घोषणा देऊन आपला निषेध व्यक्त केला.  संभाजी उद्यानासमोर करण्यात आलेल्या या निदर्शनाप्रसंगी सरकारने नुकतेच तृतीयपंथीय संरक्षण विधेयकाचे दहन करण्यात आले. आणि मोदी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. आपली भूमिका मांडताना सोनाली दळवी म्हणाल्या, आम्हाला आमची ओळख ठरविण्याचा अधिकार आहे की नाही,  ग्रामीण भागातील तृतीयपंथीयांचे प्रश्न अद्याप बाकी आहे. सरकार म्हणते आम्ही शरीरविक्रीचा व्यवसाय करायचा नाही. मग आम्ही करायचे काय? आमच्या पोटापाण्याचा प्रश्न कोण सोडविणार, आम्हाला कोण रोजगार देणार? गुरु चेला पध्दत बंद करण्यास सांगितले आहे. तसे झाल्यास समाज आम्हाला स्वीकारणार आहे का?  कुटूंबातील माणसे स्वीकारत नसल्याने आधार म्हणून गुरु चेला पध्दत अनुसरावी लागते. आमच्या प्रश्नांवर गांभीयार्ने विचार करण्याची गरज आहे.  रस्त्यावर भीक मागू नये असेही या विधेयकात म्हणण्यात आले आहे. त्यामुळे या विधेयकाच्या विरोधात शहरातील तृतीयपंथीयांनी एकत्र येत आंदोलन केले. रोजगार, समाजाकडून मिळणारी सापत्निकपणाची वागणूक, तसेच म्हातारपणी तृतीयपंथीयांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याची खंत चांदणी गोरे यांनी व्यक्त केली.  यावेळी विविध घोषणांचे फलक घेऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विधेयकाची होळी करण्यात आली.  या आंदोलनात चांदणी गोरे, सोनाली दळवी, सानिया शेख आदी उपस्थित होत्या. *  सानिया शेख म्हणाल्या, ट्रान्सजेन्डर विधेयक हे आमच्यावर अन्याय करणारं विधेयक आहे. आम्ही या विधेयकाचा विरोध करतो. सरकारला वाटत असेल की आम्ही भीक मागू नये तर सरकारने आमच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच या विधेयकामुळे जे म्हातारे आहेत त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल. 

टॅग्स :PuneपुणेTransgenderट्रान्सजेंडरGovernmentसरकार