शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

औरंगजेबाने मागवलेला आंबा अजूनही कुठं पिकतो? जाणून घ्या त्यामागील रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 18:55 IST

जुन्नर तालुक्यात अजूनही या आंब्याची गोडी कायम

ठळक मुद्दे आंब्याची सातवाहन काळात नोंद, औरंगजेबला पाठविलेल्या पत्रातही आढळतो उल्लेख

अशोक खरात

खोडद: जुन्नर तालुक्यातील आंब्यांची सातवाहन काळातही नोंद आहे. औरंगजेबला पाठवलेल्या पत्रात देखील या आंब्यांचा केलेला उल्लेख आढळतो. विशेष म्हणजे इतक्या वर्षानंतरही जुन्नरच्या आंब्यांची गोडी आजही जशीच्या तशी आहे. उत्कृष्ट चव असलेल्या या आंब्यांना बाजारपेठेत विशेष मागणी आहे.

जुन्नर तालुक्यातील आंबा जून महिन्यात विक्रीसाठी बाजारपेठेत येतो. या भागात आजही  ५० ते ७० वर्ष झालेल्या आंब्याच्या चांगल्या उत्पादक बागा आहेत.  तालुक्यात प्रामुख्याने येणेरे, तांबे, काले, दातखिळवाडी, पारुंडे, वैष्णवधाम, निरगुडे, बोतार्डे, शिंदे राळेगण, खामगाव, माणिकडोह, बेलसर, चिंचोली, वडज, सुराळे, वाणेवाडी, धालेवाडी, कुसुर, गोद्रे, काटेडे, तेजुर, पुर, शिरोली, कुकडेश्वर इत्यादी गावांमधील शेतकरी आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. या भागातून येणारा आंबा उशिरा येणारा असला तरी हा आकाराने मोठा असतो. या भागातील माती आणि  हवामानामुळे या आंब्याची उत्कृष्ट चव लागते. 

सन १६१० मध्ये मलिक अंबरने जुन्नरला राजधानी करुन विविध फळ बागांचा विकास केला. हबशी सरदार मलिक अंबर याने जुन्नरच्या पूर्वेला एक टोलेजंग महाल बांधून परिसरात आंबे लावले होते. या बागेला पाणीपुरवठा करण्यासाठी जवळच मातीचा बांध घालून बादशाहा तलाव बांधला. म्हणूनच कालांतराने हा भाग आफिजबाग म्हणुन ओळखला जाऊ लागला. काही भाग अमरापुर म्हणुन नोंद आहे.

मोघल कालखंडात जुन्नर प्रांतात औरंगजेब बादशाहाची  ३५० झाडांची सरकारी आमराई होती. अशी सेतू माधवराव पगडी लिखित  'मोघली दरबारातील बातमीपत्र' या ग्रंथात नोंद असल्याचे इतिहास संशोधक प्रा.लहू गायकवाड यांनी सांगितले.

मूहरमखान हा फळांच्या सरकारी बागांचा दारोगा ( व्यवस्था पाहणारा ) होता. त्याने औरंगजेबला पत्राद्वारे जुन्नर मधील आंब्यांविषयी पुढीलप्रमाणे कळविले - "जुन्नर परगाण्याजवळ इरसाली आंब्याची साडेतीनशे झाडे आहेत. आता झाडांना मोहर आला आहे. या झाडांची निगा राखण्यासाठी कोणाची तरी नेमणूक व्हावी."

यावर औरंगजेब बादशाहाने कळविले की, "आंबे तयार झाल्यावर काळजीपूर्वक पाठवावेत. जुन्नर साठी रहमतुल्ला यास पाठविले आहे. आंब्याचा मोहर गळू नये यासाठी काळजी घ्यावी. यावरून जुन्नरचा आंबा औरंगजेबाच्या दरबारी जात होता हे स्पष्ट होते. तसेच या आंबा बागेवर खुद्द औरंगजेबाचेही जातीने लक्ष होते हे ही जाणवते असल्याचे त्यांनी सांगितले. 

"जुन्नर परिसरातील आंबा लागवडी चा इतिहास  हा सातवाहन काळापासून  म्हणजे २ हजार वर्षांपासून सुरू होतो.आंब्याची ओळख चिनी प्रवासी ह्यु - एन-त्संग याने भारताला करुन दिली असे म्हणतात,पण या अगोदर सहाशे वर्ष  सातवाहन साम्राज्यातील 'गाथा सप्तशती' मध्ये या आंब्याबाबत  अनेक गाथांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. पोर्तुगीजांनी गोव्यात हापूस लागवड करण्याच्या आधीपासूनच जुन्नर मध्ये इरसाल, कलमी , रायवळ या जातीचे आंबे होते याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत." अस ते म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेKhedखेडMangoआंबाhistoryइतिहास