शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘कुठे नेऊन ठेवलाय दिवाळसण आमचा?’, नेटक-यांचा नेटका सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 06:35 IST

नुकतेच पेट्रोलचे दर ८० रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहेत. त्या तुलनेत कच्च्या तेलाचे दर स्वस्त असताना वाढलेले पेट्रोलचे दर पाहून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बारामती : नुकतेच पेट्रोलचे दर ८० रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहेत. त्या तुलनेत कच्च्या तेलाचे दर स्वस्त असताना वाढलेले पेट्रोलचे दर पाहून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऐन सणासुदीच्या काळात ही महागाई अतिशय त्रस्त करणारी ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर १९७१ साली संपूर्ण दिवाळीचे किराणा सामान अवघ्या ४३ रुपयांमध्ये खरेदी केलेल्या मालाची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे ‘कुठे नेऊन ठेवलाय दिवाळसण आमचा?’ असा संतप्त सवालदेखील नेटकºयांनी यामधून विचारला आहे.दिवसेंदिवस वाढत जाणाºया महागाईमुळे सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. महागाईच्या मुद्द्यावर विरोधक आणि सत्ताधाºयांमध्येदेखील तू-तू-मै-मै सुरू आहे. पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस या बरोबरच जीवनावश्यक वस्तुंचे दर गगनालाच भिडले आहेत. त्यामुळे सर्वसमान्य नोकरदार, शेतकरी, कष्टकरी वर्गाला महिन्याचे खर्चाचे गणित जमवताना नाकीनऊ येत आहेत. त्यात ग्रामीण आणि शहरी भागातदेखील मोलमजुरीवर जगणाºयांची संख्यादेखील मोठी आहे. सणासुदीच्या काळात घरोघरी मिठाई, तसेच फराळाचे पदार्थ तयार केले जातात. या दरम्यानच महागाई वाढते, डाळींच्या किमती वाढतात, किराणा मालाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये राहत नाहीत. परिणामी पोटाला चिमटा देऊन सण साजरे करण्याची वेळ येते. महागाई कमी करण्याबाबत शासन स्तरावरून दररोज नवनव्या घोषणा होतात. मात्र त्याची फलनिष्पत्ती किती होते, हे सर्वसामान्यांच्या आकलनाबाहेरचे असते. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सध्या १९७१ मध्ये दिवाळी सणासाठी किराणामाल खरेदी केलेली एक यादी व्हायरल झाली आहे. अवघ्या ४३ रुपयांमध्ये दिवाळीची संपूर्ण खरेदी झाली आहे. २ किलो शेंगदाणे अवघ्या ९ रुपयांमध्ये तर दीड किलो डालडा ३ रुपयांना, १५ किलो गहू १४.५० रुपये, हरभरा डाळ १.२५ रुपये, तुरडाळ १.९५ रुपये, दीड किलो पोहे ९० पैसे, २ किलो साखर ४.२० रुपये, २ किलो तांदूळ २.७५ रुपये हे काही निवडक किराणा सामानाचे १९७१ सालचे असलेले दर या यादीमध्ये आहेत. या यादीबरोबरच ‘कुठे नेऊन ठेवलाय दिवाळसण आमचा?’ असा संतप्त सवालदेखील नेटकºयांनी विचारला आहे. तसेच महागाईवरून लक्ष हटवण्यासाठीच सत्ताधारी आपआपसात चिखलफेक करीत आहेत. ज्यांनी निर्णय घ्यायचा तेच आंदोलने करीत आहे. मग आम्ही आमच्या मागण्या ‘डोनाल्ड ट्रम्प’ला सांगायच्या काय?, असा मिष्किल व मार्मिक सवालदेखील उपस्थित करण्यात आला आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया