शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्ज निर्मितीचा फॉर्म्युला कुठे अन् किती जणांना विकला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 05:42 IST

पुण्यातील कुरकुंभप्रकरणी पोलिसांचा कोर्टात युक्तिवाद

लोकमत न्यूज नेटवर्क  पुणे : कुरकुंभ येथील अर्थकेम लॅबोरेटरी प्रा. लि. कंपनीचा मालक भीमाजी साबळे आणि युवराज भुजबळ हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. त्यांनी महाराष्ट्रासह देशात इतर किती ठिकाणी व किती व्यक्तींना ‘एमडी’ हा अमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा फॉर्म्युला विकला, याचा तपास करण्यासाठी आराेपींची पाेलिस काेठडी वाढवण्याची विनंती तपास अधिकारी शब्बीर सय्यद यांनी न्यायालयाला केली. त्यानुसार न्यायदंडाधिकारी जे. एम. चौहान यांनी साबळे आणि भुजबळ यांना ४ मार्चपर्यंत, तर पश्चिम बंगालहून नव्याने अटक केलेल्या सुनील बर्मन या आरोपीला ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करून आतापर्यंत दिल्ली, सांगली आणि पुणे येथे छापा टाकून  ३६०० कोटी रुपयांचे १८३७ किलोग्रॅम ‘एमडी’ जप्त केले आहेत. या ड्रग्ज प्रकरणात आरोपी  सुनील बर्मन याच्यासह एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. बर्मन याला बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. यातील भीमाजी परशुराम साबळे आणि युवराज बब्रुवान भुजबळ यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांच्यासह आरोपी बर्मन यालाही गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले. अटक आरोपींना समोरासमोर तपास करून व्यवसायाकरिता कुणी अर्थसाह्य केले. 

आरोपींनी अमली पदार्थांतून मिळालेले पैसे कोणत्या कारणासाठी वापरले, त्याबाबत त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन तपास करायचा आहे. त्यासाठी भुजबळ व साबळे यांची पोलिस  कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकील पल्लवी काशीद यांनी केली; मात्र आरोपींचे वकील ॲड. पुष्कर दुर्गे यांनी भुजबळ आणि साबळे यांच्या पोलिस कोठडीला विरोध केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने दोघांच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ केली.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ