शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका कधी होणार 'अपडेट'? संकेतस्थळावर अद्याप जुनीच माहिती; पारदर्शकतेला फासला हरताळ... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 17:09 IST

माहिती अधिकार कायद्याला गुरूवारी १२ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून कायद्याला केराची टोपली दाखविली जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.

ठळक मुद्देसध्या पालिकेच्या वेबसाइटवर दिसणारी माहिती गेल्यावर्षी अपडेट करण्यात आली आहेपुणे महापालिका माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीबाबत अत्यंत उदासीन आहे.राज्य सरकारने गेल्यावर्षी आदेश काढून माहिती अपडेट करण्याची सूचना केली.

पुणे : माहिती अधिकार कायद्याच्या कलम ४ अन्वये शासकीय कार्यालयांनी कार्यरत असलेले सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांची यादी, त्यांचे कर्तव्य व अधिकार, कार्यपद्धती, मानके, त्या विभागाचे अंदाजपत्रक, त्यांना मिळणारे अनुदान, योजना, त्यांचे लाभार्थी कोण, अधिकारी-कर्मचार्‍यांचे वेतन आदी सतरा बाबींची माहिती स्वत:हून संकेतस्थळावर जाहीर करणे बंधनकारक आहे. मात्र पुणे महापालिकेला याचा विसर पडला आहे. याबाबतची माहिती अनेक विभागांनी अपडेट केली नसल्याने जुनीच माहिती संकेतस्थळावर दिसून येत आहे.माहिती अधिकार कायद्याला गुरूवारी १२ वर्षे (एक तप) पूर्ण झाली. हा कायदा केवळ  अस्तित्वात येऊन आज, गुरुवारी (१२ आॅक्टोबर) बारा वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून कायद्याला केराची टोपली दाखविली जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. कायद्याच्या कलम चारनुसार पालिकेच्या वेबसाइटवर उघड करण्याची माहिती वर्षानुवर्ष अपडेट करण्याचे कष्टही स्मार्टसिटीचे प्रशासन घेत नसल्याचे दिसून आले आहे.माहिती अधिकार कायद्याच्या कलम चारनुसार प्रत्येक विभागाला आपली माहिती वषार्तून दोनदा जाहीर करावी लागते. त्यामध्ये विभागात काम करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांची यादी, त्यांचे कर्तव्य-अधिकार, कार्यपद्धती, मानके, त्या विभागाचे बजेट, अनुदान, योजना, त्यांचे लाभार्थी कोण, अधिकारी-कर्मचार्‍यांचे वेतन, आदी सतरा बाबींची माहिती जाहीर करावी लागते. राज्य सरकारने गेल्या वर्षी आदेश काढून एक जानेवारी आणि १ जुलै या दिवशी माहिती ‘अपडेट’ करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.सध्या पालिकेच्या वेबसाइटवर दिसणारी माहिती गेल्यावर्षी अपडेट करण्यात आली आहे. काही विभागांची माहिती तर, दोन वर्षांपूवीर्ची आहे. स्मार्ट समजली जाणारी पुणे महापालिका माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीबाबत अत्यंत उदासीन आहे. राज्य सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचा हा प्रकार गंभीर असल्याची टीका सजग नागरी मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली आहे.माहिती अधिकार कायद्यातील कलम चारनुसार अत्यंत जुजबी माहिती जाहीर करण्यास सांगितली जाते. ही माहिती जाहीर करण्यात पालिकेला काय समस्या आहे, असा सवाल वेलणकर यांनी उपस्थित केला. यापूर्वीही अशा प्रकारांबाबत वारंवार राज्य सरकारकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारने गेल्यावर्षी आदेश काढून माहिती अपडेट करण्याची सूचना केली.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे