शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

प्रशासकीय अंमल येणार कधी ?

By admin | Updated: September 7, 2016 01:30 IST

हवेली तालुक्यातील गेली चार वर्षांपासून बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्यावर (थेऊर) स्थानिकांचे प्रशासकीय मंडळ नेमण्याचे ठरविण्यात आलेले असून

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील गेली चार वर्षांपासून बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्यावर (थेऊर) स्थानिकांचे प्रशासकीय मंडळ नेमण्याचे ठरविण्यात आलेले असून, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासमवेत मंत्रालयात झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. पालकमंत्र्यांकडून अद्यापही नावे न आल्याने नियुक्तीबद्दल ठाम काही सांगता येणार नसल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे शशिकांत घोरपडे यांनी दिली.‘यशवंत’बाबत २२ आॅगस्ट रोजी सहकार व पालकमंत्री यांची बैठक झाली. या वेळी प्रधान सचिव, सहसचिव, राज्य सहकारी बँकेचे पदाधिकारी यांचेसमवेत संचालक (साखर) किशोर तोष्णीवाल, यशवंतचे प्रशासक सुरेश जरे हे उपस्थित होते. यशवंत लवकरात लवकर चालू करण्यावर मार्ग काढण्यासमवेत हा विषय घेण्यात आला होता.बापट यांनी प्रशासक मंडळाच्या सदस्यांची नावे घोरपडे यांचेकडे द्यायची, असे ठरले होते. ती नावे आजअखेर न आल्याने यशवंतचे प्रशासकीय मंडळ कधी नेमणार ? असा प्रश्न सर्वांपुढे उभा आहे.यातून मार्ग काढून कारखाना पुन्हा पूर्ववैभवाने चालू व्हावा, याकरिता कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देणे किंवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या रकमेसाठी आवश्यक तेवढ्या जमिनीची लिलाव पद्धतीने विक्री करणे हे दोन पर्याय पुढे आले.परंतु चालवायला कोणीही पुढे आले नाही. लिलाव करण्याच्या प्रयत्नांना तीन वेळा यश आले नाही. नगदी व हमखास पैसा मिळवून देणारे पीक असल्याने आजही पूर्व हवेलीमध्ये मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जात असून, या पिकाचे क्षेत्रही या भागात जोरदार आहे.परंतु, गेल्या चार वर्षांत यशवंतची झालेली दुरवस्था व उसाचे कोसळलेले दर या दुहेरी कात्रीत येथील शेतकरी अडकला असून, आपल्या शेतातील ऊस गाळपास घालवण्यासाठी त्याला साखरसम्राटांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. केवळ यशवंत बंद झाल्याने त्याचेवर ही वेळ आलेली असून, त्यामुळे आपल्या हक्काचा कारखाना केव्हा सुरू होणार ? हा सवाल त्याला वारंवार सतावत आहे.राज्य सहकारी बँकेने जमीनविक्री केली असती, तर सर्व बोजा उतरून यशवंत पूर्ववैभवांत पुन्हा चालू झाला असता. परंतु विक्रीबाबत बँकेस अपयश आल्याने हा प्रश्न तसाच भिजत पडला आहे. फेब्रुवारी/ मार्चमध्ये आसवणी प्रकल्प सुरू करून मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु पैश्याच्या अनुपलब्धतेमुळे तोही बारगळला. प्रशासकीय मंडळाची स्थापना झाली, तर पैशाच्या उपलब्धतेबाबत नवनवे प्रस्ताव समोर येतील,