शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

उद्यानांची दुरवस्था संपणार कधी?

By admin | Updated: November 15, 2016 03:14 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात एकूण १५७ छोटी-मोठी सार्वजनिक उद्याने उभारली आहेत. भोसरीतही यांपैकी १० उद्याने आहेत. त्यातील भोसरी सहल केंद्र,

भोसरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात एकूण १५७ छोटी-मोठी सार्वजनिक उद्याने उभारली आहेत. भोसरीतही यांपैकी १० उद्याने आहेत. त्यातील भोसरी सहल केंद्र, आळंदी रोड येथील सखुबाई गवळी उद्यान, मॅगझिन चौक परिसरातील रामभाऊ गवळी बालोद्यान अशी मोठी उद्यानेही या भागात आहेत. पण यातील बहुतांश उद्यानांची दुरवस्था झालेली दिसून येते. सहल केंद्रातील बोटिंग बंद झाली असून, देखभालीच्या अभावाने या उद्यानात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. रामभाऊ गवळी बालोद्यान तर जंगलच झाले आहे. सुरक्षारक्षकांच्या अभावाने हे उद्यान मद्यपींचा अड्डा बनला असून, त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. भोसरी सहल केंद्र हे वैशिष्ट्यपूर्ण उद्यान महापालिकेने पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले. पण सध्या या उद्यानात पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय नाही. जलतरण तलावाची दुरवस्था झाली आहे. उद्यानात रोज जमा होणारा कचरा उद्यानातच ठिकठिकाणी ढीग करून ठेवला जातो किंवा पेटवून दिला जातो. त्यामुळे स्वच्छता असली, तरी ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येतात. कंत्राटी तत्त्वावर दिलेले बोटिंग क्लब बंद असून, बोटींची दुरवस्था झाली आहे. उद्यानातील जॉगिंग ट्रॅकभोवतीचे सर्वच सांगीतिक दिवे तुटलेल्या अवस्थेत आहेत. आळंदी रस्त्यालगतचे सखुबाई गवळी उद्यान हे त्या मानाने इतर उद्यानांपेक्षा सुस्थितीत आहे. अगदी कमी जागेत विकसित केलेल्या या वैविध्यपूर्ण उद्यानात आबालवृद्ध व महिला सकाळ-संध्याकाळी गर्दी करीत आहेत. मॅगझिन चौकातील येथे रामभाऊ गबाजी गवळी बालोद्यानात कसलीही सुविधा उपलब्ध नाही. (वार्ताहर)