शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा तपासणीसाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्याचीच होते हॉस्पिटलकडून अडवणूक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 13:18 IST

तपासणीसाठी गेलेल्या एका अधिकाऱ्याला अचानक अँजिओग्राफी करावी लागते. यानंतर सोबत बिलाची रक्कम नसल्याने ही रक्कम भरल्यावरच तुम्हाला डिस्चार्ज दिला जाईल, अशी आडमुठी भूमिका रुग्णालय प्रशासनाकडून घेतल्यावर अधिकाऱ्याला फक्त मनस्ताप सहन करावा लागतो.

ठळक मुद्देतत्काळ बिलाची रक्कम भरा अन्यथा डिस्जार्च नाही  संबंधित आरोग्य अधिका-यांनी हे शिबिर आपल्या अख्त्यारीत नसल्याचे सांगत हतबलता

पुणे : आरोग्य विभागाच्या वतीने महापालिकेच्या अधिका-यांसाठी कर्वे रस्त्यावरील एका हॉस्पीटलमध्ये मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्यानुसार एक अधिकारी आरोग्य तपासणीसाठी गेले असता त्यांना तातडीने अँजिओग्राफी करण्यात आली. केवळ तपासणीसाठी गेलेल्या या अधिका-याला बिलाची रक्कम तातडीने देणे शक्य नव्हते. बिलाची रक्कम न दिल्याने हॉस्पीटल प्रशासनाने अधिका-याला डिस्जार्च देण्सास ठाम नकार दिला. यामुळे अधिका-याला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.     पुणे महापालिकेच्यावतीने नगरसेवक आणि अधिका-यांसाठी कर्वे रस्त्यावरील एका हॉस्पीटलसोबत करार करून मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. नुकतेच पालिकेचे वरिष्ठ अधिकारी सकाळी तपासणीसाठी हॉस्पीटलमध्ये गेले. मोफत तपासण्या असल्याने त्यांनी सोबत फारसे पैसेही नेले नव्हते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने अँजिओग्राफी करण्यास सांगितले. डॉक्टराने तातडीने सांगितल्याने अधिकारी देखील लगेच तयार झाले. डॉक्टरांनी देखील त्वरीत आॅपरेशन केले. संध्याकाळी अधिका-याने डिस्चार्ज द्या, असे सांगितले. यावर रुग्णालय प्रशासनाकडून तुम्हाला २२ हजार रुपये भरावे लागली. त्यानंतरच डिस्चार्ज दिला जाईल असे उत्तर आल्यावर संबंधित अधिका-यांना फोन केला. त्यावेळी संबंधित आरोग्य अधिका-यांनी हे शिबिर आपल्या अख्त्यारीत नसल्याचे सांगत हतबलता व्यक्त केली. त्यामुळे त्यांनी वरिष्ठ महिला अधिका-याला फोन लावला. त्यांनी मुलाला पैसे घेऊन बोलवा आणि डिस्चार्ज घ्या, असा सल्ला दिला. सुट्टयांमुळे कुटुंबीय पुण्यात नसल्याने अधिका-यांची चांगलीच अडचण झाली. अखेर ज्या आरोग्य प्रमुखाच्या समन्वयातून हे आरोग्य शिबिर झाले त्यांचा फोन आला. त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर दीड हजार रुपये घेऊन अधिका-याला घरी सोडण्यात आले. 

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाEmployeeकर्मचारी