शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर निवडणुक म्हणजे काय असतं रे भाऊ ? पुण्यातील बहुतांश नागरिक व तरुणाई अनभिज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 17:26 IST

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला अवघे काही दिवस राहिल्यामुळे प्रचारात रंगत आली आहे...

तेजस टवलारकर- 

पिंपरी : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदानाला अवघे काही दिवस राहिल्यामुळे प्रचारात रंगत आली आहे. सर्व उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू असला तरी, शहरातील बहुतांश नागरिक, तरुण निवडणुकीविषयी अनभिज्ञ असल्याची स्थिती आहे. पदवीधर निवडणुकीसंदर्भात शहरातील चहा दुकान, महापालिकेचा परिसर, पीएमपी बस, त्याचबरोबर काही तरुणांशी संपर्क केला असता, अनेकांना पदवीधर निवडणुकीची माहिती नसल्याचे दिसून आले.

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक म्हणजे काय ? या निवडणुकीत मतदान ईव्हीएमच्या माध्यमातून होते की मतपत्रिकेव्दारे होते ? निवडून आलेला उमेदवार नेमके काय काम करतो? मतदान कसे करायचे ? पदवीधर मतदारसंघात मतदान करण्यासाठी वयाची अट असते का ? यात फक्त तरुण मतदान करू शकतात का? या प्रश्नांवरून नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून आले.

अनेकांनी ही निवडणूक ईव्हीएमच्या माध्यमातून होते असेच सांगितले. यंदा कोरोनामुळे ईव्हीएम वग‌ळून मतपत्रिकेचा वापर करून निवडणूक होत असल्याचे काही लोकांनी सांगितले. काही नागरिकांनी सांगितले की या निवडणुकीत मतदान करण्यासाठी वयाची अट असते. त्याचबरोबर कुठे मतदान करायचे, सार्वत्रिक निवडणुकीसारखे सगळेच या निवडणुकीत मतदान करू शकतात का ? याबात माहिती नसल्याचे दिसून आले. पदवीधर निवडणुकीबरोबर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. त्यामुळे अनेकांना या निवडणुकीत फक्त शिक्षकच मतदान करू शकतात, असे काहींनी सांगितले. निवडून आलेला उमेदवार हा नेमके काय काम करतो हे देखील अनेकांना माहिती नाही. या निवडणुकीत कोणते उमेदवार उभे आहेत याविषयी विचारले असता नागरिकांना पक्षांची नावे माहिती आहेत. परंतु सध्याच्या उमेदवारांविषयी फारशी माहिती नसल्याचे दिसून आले. विधान परिषदेची रचना करताना विविध वर्गातले लोक वरिष्ठ सभागृहात येतील, असा विचार करण्यात आला. त्यामु‌ळे पदवीधर मतदारसंघ निर्माण झाला. पदवीधर मतदारसंघ म्हणजे समाजातल्या पदवीधर लोकांनी निवडून दिलेला पदवीधर आमदार.---

अशी होते मतमोजणीसंबंधित मतदारसंघाची मतदान संख्या व उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतात. निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकाची मते मिळविणारा उमेदवार विजयी होतो. पण पहिल्या पसंतीची मते कोट्याएवढी नसल्यास दुसर्‍या पसंतीची मते जो पूर्ण करेल, तो उमेदवार विजयी होतो. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो.

---मत असे नोंदवावे

मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभ‌ळ्या शाईच्या स्केच पेननेच मत नोंदवावे. इतर कोणत्याही पेनचा वापर करू नये.तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रमांक नोंदवाव, रकान्यात १ हा अंक लिहून मत नोंदवावे.

उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत. तितके पसंतीक्रमांक नोंदवू शकतात. एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकच पसंती क्रमांकाचा अंक नोंदवावा. तो पसंती क्रमांक क्रमांक इतर कोणत्यही उमेदवारासमोर नोंदवू नये. 

पसंतीक्रमांक हे केवळ १,२,३, अशा अंकामध्ये नोंदवाव. एक, दोन, तीन इत्यादी अशा शब्दांत नोंदवू नये.मतपत्रिका वैध ठरावी याकरिता पहिल्या पसंतीचे मत नोंदवणे आवश्यक आहे. अन्य पसंतीक्रमांक नोंदविणे ऐच्छीक आहे. अनिवार्य नाही.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकVotingमतदान